महर्षी खुली व्यायाम शाळेचे उद्घाटन संपन्न
महर्षि प्रशाला यशवंतनगर येथे महर्षि खुली व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न
व्यायाम शाळेमुळे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहील; संग्रामसिंह मोहिते पाटील
संचार (वृत्तसेवा)
महर्षि खुली व्यायामशाळेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहील असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केले.महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या शुभहस्ते महर्षि खुली व्यायाम शाळेचे उद्घाटन संपन्न झाले .याप्रसंगी मनोज रेळेकर सदस्य प्रशाला समिती सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,अॅड. नितीनराव खराडे सभापती प्रशाला समिती, संजय गळीतकर मुख्याध्यापक महर्षि प्रशाला , अनिल जाधव कार्याध्यक्ष महर्षि जिमखाना उपस्थित होते.
खुल्या व्यायामशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व विविध क्रीडाप्रेमी समूहांची सर्व सोयी सुविधांची पूर्तता झाली आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रशालेच्या मैदानावर खुल्या व्यायाम शाळेमुळे व्यायाम करणे सहज शक्य झाले आहे. सीट अप स्टेशन ,शोल्डर बिल्डर, डबलबार आऊटडोर मिनी स्कीट, फिटनेस सायकल अशा उपकरणांनी व्यायामशाळा परिपूर्ण आहे
. उद्घाटनाप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या हस्ते संपन्न झाला.महर्षि प्रशालेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत सलग दोन वर्ष माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक व चालू वर्षी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. प्रशालेत झालेल्या नवीन भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील तक्ते ,वर्ग सजावट, विद्यार्थ्यांनी काढलेली सुंदर चित्रे पाहूनसर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षकांचे कौतुक केले.सदर कार्यक्रमास प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, नितीन इंगवले देशमुख , विनोद जाधव, मुख्याध्यापिका अनिता पवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.आभार मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी मानले.