कै.उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने उद्योगमहर्षि कै उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त वृक्षरोपण
अकलूज : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने उद्योगमहर्षि कै.उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 64 व्या जयंतीनिमित्त वृक्षरोपण करून आदरांजली वाहण्यात आली.
माळेवाडी-अकलूज येथील अंगणवाडी शाळेच्या परिसरामध्ये अकलूज नगरपरिषदेचे उपमुख्यअधिकारी जयसिंह खुळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी भारत आगलावे, प्रा अरविंद वाघमोडे,प्रवीण गायकवाड, महेश कुलकर्णी, प्रेस संपादक व पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे उपजिल्हाध्यक्ष शशिकांत कडबाने, शहराध्यक्ष संजय लोहकरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शामल कुलकर्णी, सेविका सुनंदा निगडी, मदतनीस रचना सोनटक्के, सुनिता खाडे, लक्ष्मी हेगडे, फुलाबाई फुगे आदी उपस्थित होते.
पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून चांगला संदेश दिला असून वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत उपमुख्यअधिकारी जयसिंह खुडे यांनी व्यक्त केले.
पत्रकार संघाच्यावतीने अंगणवाडी परिसरात केलेला वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असून संघाच्यावतीने अंगणवाडीतील समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे पर्यवेक्षिका शामल कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी भारत आगलावे, प्रा अरविंद वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त करून परिसरातील अडचणी मांडल्या.
पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी सेवा संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी संघ घेत असल्याचे सांगितले