अकलूज येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयाने “सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या” निवेदनास दाखवले केराची टोपली

अकलूज येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयाने “सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या” निवेदनास दाखवली केराची टोपली
संचार वृत्त
अकलूज शहरातील गणेशोत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळ यांच्या मध्यवर्ती मिरवणुकीच्या मार्गावरील विजेच्या तारा वरती उचलून घेण्याबाबत सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाने उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग कार्यालय अकलूज यांना निवेदन दिले होते या निवेदनात गणेशोत्सव मंडळ असो अथवा नवरात्र उत्सव मंडळ असो या मंडळांच्या मिरवणुकीच्या वेळी विजेच्या तारा त्या मिरवणुकीस अडथळा निर्माण करतात त्या अनुषंगाने विजेच्या तारा उचलून घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते मात्र कार्यकारी अभियंता कार्यालयाने सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघाच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने भाविकांनी नागरिकात संतापाची लाट निर्माण झाली आहे
मिरवणुकीच्या वेळी शोभाताला विजेच्या तारांचा अडथळा निर्माण होतो त्याप्रसंगी मंडळातील कार्यकर्ते जीव मोठे धरून व धोक्यात घालून त्या वरती सारण्याचा प्रयत्न करतात मात्रौ अनावधानाने एखाद्या विजेच्या तारेचा धक्का लागला आणि त्या कार्यकर्त्यास काय बरे वाईट झाले अथवा जीवाला धोका झाला तर याला जबाबदार कोण? वारंवार वीज ग्राहक वेगवेगळ्या तक्रारी घेऊन कार्यालयात जात असतात मात्र या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या तक्रारी कडे जाणून बसून दुर्लक्ष करतात मात्र विजेचे बिल एक महिना न भरल्यास तातडीने वीज खंडित करायला हे कर्मचारी प्रामाणिकपणे येतात शिवाय ग्रामीण भागातील नागरिक सर्रास उघडपणे विजेच्या तालावर आकडा टाकून वीज वापर करत असतात मात्र त्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे त्याच्याकडे डोळेझाक केली जाते.
त्याचाच भुर्दंड शहरी वीस ग्राहकांना बसतो आणि त्या वीज चोरीचा अनुशेष भरून काढण्यासाठी तो अनुशेष शहरी भागातील ग्राहकावर लागला जातो हा सरासरी शहरी भागातील ग्राहकांवर अन्यायच नाही का?
मात्र गणेशोत्सव मिरवणूक असो अथवा नवरात्र महोत्सव मिरवणूक त्याप्रसंगी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करूनही त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते त्या अनुषंगाने सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघाने निवेदनाद्वारे केलेली मागणी पुढील प्रमाणे
अकलूज शहरातील गणेश मंडळ नवरात्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात येत असते.या मिरवणुकीच्या वेळेला आपल्या विजेच्या पोलच्या तारा खाली आल्याने मिरवणुकीच्या डेकोरेशन कमानीला अडथळ्यांची परिस्थितीनिर्माण होत असतो आशा वेळेला विजेची तार उचलण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळीच्या नादात होत असते. ही विजेची तार उचलण्याच्या नादात विजेचा करंट लागून मानवी जिवाचा अपघाती मृत्यू ही होऊ शकतो व शॉर्टसर्किट आल्याने मिरवणुकीच्या डेकोरेशनला आग लागून विचित्र घटना घडू शकते.तरी मध्यवर्ती मिरवणूक ठिकाण खालील नमूद केल्याप्रमाणे ठिकाण : दुर्गा माता मंदिर, लोहार गल्ली ते जुने ग्रामपंचायत पर्यंत ते सदुभाऊ वाचनालय ते शिवापूर पेठ ते मारुती मंदिर इथपर्यंत विजेच्या तारा आलेल्या आहेत. तरी ते विजेच्या तारा उचलून घ्यावेत. वरील नमूद केलेल्या ठिकाणी मिरवणूक महामार्गावरती विद्युत तारा उचलून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
पश्चिम भारत अध्यक्ष मानव शक्ति स्तंभ ,”अमोल बाळासाहेब माने”