ग्रामपंचायत च्या दिव्यांग निधीत भ्रष्टाचार
ग्रामपंचायतींकडून निधी नाही, दिव्यांगांचा अन्नत्याग
अकलूजच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन
संचार वृत्त
माळशिरस तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दिव्यांगांचा पाच टक्के निधी न देता त्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील दिव्यांगांनी शुक्रवारी येथील प्रांत कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दिव्यांगानी दिलेल्या निवेदनात म्हटले की,तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दिव्यांग निधीत भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी व्हावी. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी करत असणारे शासकीय अधिकारी यांची शारीरिक तपासणी करा. शासनाने भरपूर आम्हाला सवलती दिलेल्या आहेत, परंतु या सवलती शासकीय अधिकारी दिव्यांगांपर्यंत पोहोचू देत नाहीत. दिव्यांगाच्या निधीचा भ्रष्टाचार करून शासकीय अधिकारी दिव्यांगाच्या निधीचा व त्या निधीचा भ्रष्टाचार करत आहेत, तरी त्यांच्यावर कायदेशीर
कारवाई केलीच पाहिजे, या मागणीसाठी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन केले आहे. यात अध्यक्ष विजय कुलकर्णी, अल्ताफ काझी, बंडू विठ्ठल कीर्ती आदी दिव्यांग बांधव होते.