बादशाह शेख यांना नवी दिल्ली येथील “नॅशनल एक्सेलान्स” पुरस्कार प्रदान
अकलूज येथील -बादशाह शेख यांना नवी दिल्ली येथील “नॅशनल एक्सेलान्स “पुरस्कार प्रदान
अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते व मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक बादशाह रहिमतुल्ला शेख यांना सामाजिक कार्याबद्दल दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथील “इंडियन एक्सलान्सी पुरस्कार” 2024 हा जनरल कौन्सिलर मॉन्टीनेग्रो (युरोप )श्रीमती जानिसा दरबारी व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री ‘तीरथसिंग रावत’ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
याप्रसंगी अभिनेत्री नुपूर मेहता , इंडियन मेडिकल असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती नायक आदी मान्यवर उपस्थित होते
इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन अँड टीम जेनिथ
यांच्या वतीने दरवर्षी सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते बादशाह रहिमतुल्ला शेख यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत हजारो सुशिक्षित तरुण बेरोजगारांना कर्ज मिळवून देण्याचे कार्य, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मदत करणे तसेच कोरोना काळात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ररेमडेसिव्हर लस
उपलब्ध करून देणे, अन्नधान्याचे किट वाटप करणे, अल्पसंख्यांक समाजातील महिलांना एकत्रित करून मार्गदर्शन करणे इत्यादी समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बादशाह शेख यांना सामाजिक कार्याबद्दल एक्सेलान्सी पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.