पत्रकार क्षेत्रात भारत मगर यांची चमकदार कामगिरी
पत्रकारांना प्रेरणा देणारे मार्गदर्शक भारत तात्या मगर
बी.टी.शिवशरण मुख्य संपादक
साप्ताहिक गस्तपथक
संचार वृत्त
माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे हे गाव महाराष्ट्रात कुस्तीगीरांचे गाव म्हणून आदराने घेतले जाते गाव सधन व विकसित आहे ज्या गावात आदर्श परंपरा सुसंस्कृत वातावरण असते त्या गावातील नागरिक युवक विद्यार्थी हे निश्चित आपले ध्येय साकार करुन घडत असतात जो तो आपापल्या परीने त्या त्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करुन आपले योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो व्यक्तीच्या अंगात कलाकौशल्य असेल तर ती व्यक्ती निश्चितच पुढे जाऊन नाविन्यपूर्ण काम करु शकते असेच एक चांगले उदाहरण म्हणून ज्यांच्या व्यक्तीमत्वाकडे पाहिलं जाते ते निमगाव मगराचे येथील एक निस्पृह पत्रकार म्हणून त्यांनी अत्यंत निकोप व निर्लेप विचारधारेतून पत्रकारिता केली ते भारत तात्या मगर भारत तात्या मगर यांनी छत्तीस वर्षे पत्रकारिता केली पण त्यांनी ती करत असतांना कधीही अहंकार बडेजाव मिरवला नाही विकासात्मक व प्रबोधनात्मक पत्रकारिता प्रयोजनमूलक केली 1986साली सोलापूर येथून निघणारे दैनिक संचार या वृत्तपत्रात त्यांची पहिली बातमी प्रसिद्ध झाली आणि तेथूनच त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली मनात दृढनिश्चय सकारात्मक विचार विनम्र स्वभाव यामुळे त्यांनी माणसं जोडली घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आडवळणी गाव तरीही मनात जिद्द कष्ट करण्याची तयारी धडपडणारा स्वभाव लिखाणाची आवड यामुळे ते एका ठिकाणी स्वस्थ बसून राहिले नाहीत त्यांनी आता पर्यंत दैनिक संचार लोकमत पुढारी तरुण भारत केसरी पुणे वर्तमान सामना प्रभात लोकसत्ता व आता दिव्य मराठी मध्ये ते प्रतिनिधी आहेत काही साप्ताहिकात पोलिस टाइम्स स्वराज्य श्री व चित्रलेखा यामध्ये काम केले आहे माळशिरस तालुका पत्रकार संघाचे ते सलग सात वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे सन 2007साली पत्रकार संघाचे पुनर्जीवन करून तालुक्यातील युवा ज्येष्ठ पत्रकार यांना संघटीत करून पत्रकार संघाची पुनर्बांधणी केली सर्वांना समान न्याय समान संधी हे सुत्र त्यांनी अवलंबले पत्रकार यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून त्याच्या कडे पाहिले जाते आदर्श शिस्त व चांगुलपणा या बाबींकडे तात्यांनी लक्ष केंद्रित केले ते अध्यक्ष असताना त्यांनी कधीही गटबाजीला थारा दिला नाही सर्व जाती धर्माच्या पत्रकारांना एकत्रित ठेवून त्यांच्यात आपुलकी जिव्हाळा प्रेम एकमेकांबद्दल आदर निर्माण केला तात्या नेहमी पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या भल्यासाठी कार्यरत राहिले नवख्या पत्रकारांशी काही धनदांडगे प्रस्थापित मुजोर राजकीय नेते त्यांना वेगळ्या पद्धतीने पहात त्यांना आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत तेव्हा तात्या त्या पत्रकारांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत त्यांनी कधीही केव्हाही कोणावर अन्याय होऊ दिला नाही तात्यांनी पत्रकारिता सुरू करून पस्तीस हुन वर्ष पुर्ण झाली आहेत पण अत्यंत साधा सरळ स्वभाव साधा पेहराव व सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी प्रामाणिक राहिले आहेत स्वतः ते त्यांच्या शेतात लक्ष देऊन नवनवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत ते रमतात त्यांनी माळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकारां पुढं आदर्श निर्माण केला आहे ते पत्रकारांचे मार्गदर्शक आधारस्तंभ म्हणून कायम पाठीशी राहिले आहेत त्यांच्या सरळ व स्वच्छ स्वभाव भुमिकेमुळे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे संघटनेचे नेते कार्यकर्ते यांच्याशी जवळचे मित्रत्वाचे संबंध राहिले आहेत माळशिरस तालुक्यात पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत म्हणून ते मोठेपणा दाखवून कधी मिरवले नाहीत किंवा पदाचा गैरवापर केला नाही म्हणून तर ते एवढ्या प्रदीर्घ काळ पत्रकारितेत टिकून राहिले आहेत त्यांनी नेहमीच सकारात्मक व विकासाची बातमीदारी केली एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ते खोलात जाऊन त्याचा पाठपुरावा करून त्यातील सत्यता मर्म वाचकांपर्यंत पोहचतात हे त्यांच्या पत्रकारितेचे व्रत त्यांनी जपले आहे कोणाला तरी बरं वाटावं म्हणून ते खरं बोलायचे सोडत नाहीत त्यांनी निव्वळ या क्षेत्रात आपला लौकिक उमटवला आहेच परंतु शेतात स्वतः राबतात कष्ट करतात काळया आईची सेवा करताना निढळाचा घाम अंगा खांद्यावर जेव्हा ओघळताना ते अनुभवतात तेव्हा शेतीतून निघालेले भरघोस पिक ही त्यांच्या कष्टाची अनमोल संपत्ती असते त्यांचा अकरा आकटोबर ला वाढदिवस आहे ते माझे वीस वर्षांपासून या क्षेत्रातील सहकारी मित्र व जिवाभावाचे सोबती म्हणून आम्ही दोघांनी मित्रत्वाचे नातेसंबंध जपले आहेत त्यांचा महत्वाचा चांगला गुण म्हणजे अडचणीत ल्या लोकांना मदतीला धावून जाणे ते माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना तत्कालीन पंढरपूर लोकसभा खासदार रामदास आठवले यांच्या खासदार फंडातून अकलूज येथे पत्रकार भवन बांधण्यासाठी त्यावेळी आठ लाख रुपये निधी मंजूर केला होता परंतु अकलूज मध्ये पत्रकार भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे तो निधी वापरता आला नाही खासदारांकडे पुन्हा सुपुर्द केला त्यांचे कार्यकाळात पत्रकार भवन होऊ शकले नाही ही खंत त्यांना आजही आहे असो आठवणी घटना प्रसंग व त्यांचेवर खूप काही लिहण्याची इच्छा आहे परंतु काही मर्यादा आहेत ते 64 वर्षात पदार्पण करत आहेत त्यांना निरोगी आयुष्य उदंड आयुष्य मिळो व जनहिताचे व सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक चळवळीत त्यांचे हातून सकारात्मक धोरणात्मक लिखाण करण्याची त्यांना उर्जा मिळो या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सदिच्छा व्यक्त करतो