सार्वजनिक नवरात्र मंडळांनी समाजपयोगी उपक्रमाबरोबर पारंपारिक परंपरा जपली पाहिजे
सार्वजनिक नवरात्र मंडळांनी समाजपयोगी उपक्रमा बरोबर पारंपरिक परंपरा जपली पाहिजे- जयसिंह मोहिते-पाटील
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
सार्वजनिक नवरात्र मंडळांनी समाजपयोगी उपक्रमाबरोबरच पारंपरिक परंपरा जपली पाहिजे.त्यामुळे नवीन पिढीला चांगली दिशा मिळेल असे आव्हान जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. ते अकलूज येथील लोहार गल्लीतील श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडाळाने आयोजित केलेल्या पारंपरिक कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
श्री शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले आहे.त्याच प्रमाणे लहान मोठ्या मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,महापुरुषांन विषयी भाषन,मातीचे किल्ले, प्रश्नमंजुषा स्पर्धा,शुध्दलेखन स्पर्धा असे उपक्रम मंडळ राबवित आहे.या वेळी मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांनी मंडळास भेट दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष समीर माने यांनी बाळदादांचा सत्कार केला.यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रतिक म्हेत्रे,खजिनदार विनायक माने(सर),कार्याध्यक्ष शिवम चव्हाण,सचिव रोहित टेके, विनायक चव्हाण,केदार सोनके, महादेव माने,विनोद चव्हाण, उमेश थोरात व सर्व सभासद उपस्थित होते.यावेळी बाळदादांनी मंडळातील तरूण कार्यकर्त्याच्या कामाचे कौतुक केले.