माळीनगर ग्रामस्थांना शिवसेना (उद्धव ठाकरे) माळशिरस तालुका यांचा जाहीर पाठिंबा
माळीनगर ग्रामस्थांना शिवसेना (उद्धव ठाकरे) माळशिरस तालुका यांचा जाहीर पाठिंबा
संचार वृत्त
माळीनगर येथे उपोषणास बसलेल्या माळीनगर ग्रामस्थांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुका यांचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. माळीनगर मधून झालेल्या पालखी महामार्गामुळे माळीनगर मध्ये रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे समस्त माळीनगर येथील रहिवाशी बेमुदत साखळी उपोषण करीत आहेत.हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदानुसार समाजसेवेसाठी माळशिरस तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळीनगर ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व आपणास फक्त पाठिंबा देऊन शांत बसणार नाही तर आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत या गोष्टीचा आम्ही देखील जातीने पाठपुरावा करू व माळीनगरकरांना आपला हक्क मिळवून देऊ असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले.यावेळी माळशिरस तालुका प्रमुख संतोष राऊत,अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे,लक्ष्मण डोईफोडे, अरुण मदने, मिलिंद मोरे, अतुल कांबळे, मोहन चव्हाण, विनायक राऊत, राजेंद्र पिसे, अभिजीत वजाळे, विजय म्हत्रे, ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.