solapur

अकलूज येथे अँपेक्स हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी जन आरोग्य योजना सुरू गोरगरीब बालक रुग्णांनी लाभ घ्यावा;डाँ. राजीव राणे (कविटकर)

अकलूज येथे अँपेक्स हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी जन आरोग्य योजना सुरू गोरगरीब बालक रुग्णांनी लाभ घ्यावा;डाँ. राजीव राणे (कविटकर)

संचार वृत्त अपडेट 

 सोलापूर जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या अकलूज येथील राणे परिवाराच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये लहान बालकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली असून या मोफत योजनेचा लाभ गोरगरीब बालक रुग्णांनी घ्यावा असे आव्हान हॉस्पिटलचे प्रेसिडेंट बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे (कविटकर) यांनी केले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ शितलदेवी राजीव राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ.राजीव राणे हृदय रोग तज्ञ डॉ. नितीन राजे राणे स्त्री रोग तज्ञ डॉ. रेवती राणे, चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. मनीष राणे, रेडिओ ऑन जेस्ट डॉ. स्नेहल राणे, डॉ. अमित शेटे, डॉ. सुरज एकतपुरे, आरोग्य मित्र लोखंडे, पवार तसेच राजू शिंदे आधी मान्यवर उपस्थित होते.

या शासनाच्या योजने संदर्भात अधिक माहिती देताना या हॉस्पिटलचे बाल शिशुपाल रोग तज्ञ डॉक्टर मनीष राजीव राणे म्हणाले जन्मलेल्या एक दिवसाच्या बाळापासून ते अठरा वर्षाच्या रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत गोरगरीब पालकांना आपल्या पालकांचे आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया उपचार करता येत नव्हते ते आता अकलूजला संपूर्ण माळशिरस तालुक्यातील बाल रुग्णांच्या सोयीसाठी ही योजना डॉ. राजीव राणे यांनी अथक परिश्रम घेऊन योजना आणली आहे. आता अकलूज मध्ये सोय निर्माण झाल्याने जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पालकांनी बाल रुग्णावर शासन निर्धारित आजारावर उपचार शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी रेशन कार्ड, बाल रुग्णांचे आधार कार्ड, जन्माचा दाखला, अथवा रुग्णालयात जन्मलेल्याचा दाखला आधी कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहे कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बहात्तर तासांच्या आत शासन स्थळावर मंजुरी घेऊन उपचार करण्यात येतील त्याकरता पालकांनी सर्व कागदपत्रे अपडेट करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर मनीष राणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button