solapur

माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर रणजीतसिंह शिंदे यांची निवडणूक

माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर रणजीतसिंह शिंदे यांची निवडणूक

बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार

श्रीपूर

माढा विधानसभा निवडणुकीत या वेळी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे निवडणूक रिंगणात नाहीत त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा निवडणुक लढवत आहेत आमदार बबनदादा शिंदे यांनी गेल्या पंचवीस वर्षांत माढा मतदारसंघात केलेली विकासकामे व माढा तालुक्यात सर्व गावात आणलेलं पाणी या मुद्द्यावर उमेदवार रणजितसिंह शिंदे यांनी भर दिला आहे साखर कारखान्याचे माध्यमातून तालुक्यात विकास रचनात्मक बदल दळणवळणाची सोय केल्यानं माढा तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख होती ती आमदार बबनदादा शिंदे यांनी पुसुन टाकली व तालुका सुजलाम सुफलाम बनवला आहे सहकारी साखर कारखाना देशात एक नंबरवर नेऊन ठेवला आहे अशा अनेक काही मुद्द्यांवर उमेदवार रणजितसिंह शिंदे आपल्या प्रचारात भर दिला आहे आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या हक्काची मतदार संख्या वाढवली आहे अनेक ग्रामपंचायती नगरपंचायत यांना विकास निधी भरघोस दिला आहे त्यामुळे अनेक रस्ते गटारी समाज मंदिर अंतर्गत विकास कामे होऊ शकली असे प्रचारात ठासून सांगितले जात आहे उमेदवार रणजितसिंह शिंदे व त्यांच्या समर्थकांनी माढा विधानसभा मतदारसंघ गेल्या सहा महिन्यांपासून अक्षरशः पिंजून काढला आहे गाव खेडी वस्त्या वाड्यावर तीन ते चार वेळा संपर्क दौरे केले आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी वेळी त्यांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत आहे महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये विकास कामांसाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे अनेक वार्डातील रस्त्यांची गटारीची कामे पुर्ण होत असल्याची परिस्थिती आहे माढा विधानसभा निवडणुकीत येथील मतदार तालुक्याचे बाहेरचा उमेदवार स्विकारणार नसल्याचे मुद्द्यांवर शिंदेंचे प्रचारात आग्रही भूमिका मांडली जात आहे शिंदेंच्या प्रचारात अशी जोरदार घोषणाबाजी व भर दिला जात आहे की आम्ही केवळ बोलत नाही आमचे काम बोलते उपरा उमेदवार भाषणबाजी करून फसव्या घोषणा पोकळ आश्वासने या पलीकडे यांचेकडे आहेच काय त्यामुळे मतदारांनी आपल्या भागात झालेला विकास बदल परिवर्तन पाहून व पुढे भविष्यात आपला कोण विकास करणार कोण आपल्याला साथ देईल या आत्मविश्वास ठेवून रणजितसिंह शिंदे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मतदान करावे अशी प्रचारातील त्यांचे ठळक मुद्दे राहिले आहेत महाळुंग मंडल मधील चौदा गावांत रणजितसिंह शिंदे यांनी घरोघर प्रत्यक्ष संपर्क दौरा केला आहे त्यामुळे त्यांनी सध्या तरी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button