राज्य उत्पादन शुल्क ची कारवाई 48 गुन्हे केले नोंद 45 संशयितांना अटक
राज्य उत्पादन शुल्क ची कारवाई 48 गुन्हे केले नोंद 45 संशयितांना अटक
संचार वृत्त अपडेट-अकलूज
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभाग सोलापूर या विभागाने विधानसभा २०२४ आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने दि. १ ऑक्टोबर ते दि. ६ नोव्हेंबर या कालावधीत ४८ गुन्हे नोंद केले असून ४५ संशयितांना अटक केली. या कारवाईत एक कार दोन रिक्षा व सहा दुचाकी अशा ९ वाहनांसह ११,८०,४४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकुण ६,१३२ लिटरचा अवैध मद्य जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी व संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य, मुंबईचे प्रसाद सुर्वे, सागर धोमकर (विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग), पुणे, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
कारवाईत माळशिरस विभागाचे निरीक्षक एस. जी. भवड, दुय्यम निरीक्षक माळशिरस बी. बी. नेवसे. एस. एस. भोसले, आर. डी. भुमकर, सहा. दु. निरीक्षक एस. एस. बिराजदार जवान टी. एच. जाधव, जी. एस. जाधव, पी. डी. पुसावळे, डी. ए. चौधरी, के. ऐ. गोळे, जवान नि. वाहन चालक एम. एस. जडगे यांनी सहभाग घेतला. अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्र. १८००८३३३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच
दुरध्वनी क्र. ०२१७/२३१२३७६ वरती संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.