solapur

राज्य शासनाची योजना नामी एक रुपयात पिकाची हमी;सतीश कचरे

राज्य शासनाची योजना नामी एक रुपयात पिकाची नुकसान वर हमी !  सेवारत्न सतीश कुंडलिक कचरे (मंडल कृषी अधिकारी)

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२४- २५ या वर्षासाठी लागू केली आहे.या योजनेत शेतकरी लाभार्थी तसेच नोंदणीकृत भाडेपट्टा करारदार शेतकरी यांना सहभाग घेता येतो.या योजनेमध्ये प्रती हेक्टर एक रुपयामध्ये रब्बी बागायत ज्वारी,जिरायत ज्वारी,बागायत गहू,हरभरा,कांदा या पिकासाठी अधिसूचित मंडळ,अधिसूचित तालुका निश्चित करण्यात येऊन पिके पात्र करण्यात आली आहेत.रब्बी हंगाम पिक विमासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी सोलापूर जिल्ह्यासाठी प्राधिकृत करण्यात आली आहे.पिक विमा भरण्यासाठी या कंपनीचा अधिक माहितीचा टोल फ्री क्रमांक १४४४७ हा आहे , तसेच www. oriental insurance .org . in या संकेतस्थळावर जाऊन किंवा कंपनी तालुका प्रतिनिधी  पळसे साहेब मोबाईल नंबर ७०८३६९७१७२ किंवा कृषी विभागाचे नजीकचे कार्यालय या अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.रब्बी हंगाम पिक विमा भरण्याची अंतिम मुदत रब्बी बागायत जिरायत ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर,बागायत गहू हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर ही आहे.तरी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बंधूंसाठी ऐच्छिक स्वरूपाची असलेली ही विमा योजनामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नजीकच्या काळातील सातबारा,आठ अ,आधार कार्ड,बँक पासबुक, पिक पेरा स्वयंघोषणापत्र व एक रुपया सह www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा आपले सरकार सुविधा केंद्र ( c s c ) किंवा तालुका विमा प्रतिनिधीयांचेकडे अंतिम मुदत अगोदर अधिघोषित क्षेत्रासाठी अधिघोषित पिकासाठी एक रुपया भरून पिकासाठी विमा कवच प्राप्त करून घ्यावे.शासन फॉर्म भरणाऱ्यांसाठी प्रति फॉर्म चाळीस रुपये शुल्क देत असल्यामुळे शेतकरी बंधूंनी अतिरिक्त शुल्क देऊ नये.पिक विमा कवच प्राप्त करून घेण्यासाठी शेतकरी बंधूंनी वेळेत विमा भरून मंडळ,तालुका अधिघोषीत क्षेत्रामधील पीक नुकसान वर कवच प्राप्त करून घ्यावे असे आव्हान कृषी कार्यालयापर्यंत मार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button