आ.रामभाऊ सातपुते यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
संचार वृत्त – प्रतिनिधी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या गणेशनगर अकलूज येथील निवासस्थानी 254-माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा.आ.रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा महायुतीचा घटक पक्ष आहे यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी मा.आ.रामभाऊ सातपुते यांचे स्वागत करून हार फेटा घालून सन्मान केला.
त्यानंतर मा.आ.रामभाऊ सातपुते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्यामध्ये माळशिरस विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली.
चर्चेदरम्यान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांनीही मा.आ.रामभाऊ सातपुते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेतेमंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.