solapur

मतदान जनजागृती उपक्रम राबवून भारत देशाचा नकाशा द्वारे 100% मतदान करण्याचे आव्हान

मतदान जनजागृती उपक्रम राबवून भारत देशाचा नकाशा द्वारे 100% मतदान करण्याचे आव्हान

संचार वृत्त अपडेट 

२५४- माळशिरस विधानसभा मतदारसंघ (अ.जा.) अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी अकलूज नगर परिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत मानवी साखळीद्वारे भारत देशाचा नकाशा तयार करून शंभर टक्के मतदान करणे बाबत संदेश देण्यात आला. अकलूज नगरपरिषद कार्यालय समोरील प्रंगणामध्ये 30 बाय 30 फूट मापाचा भारत देशाचा नकाशा तयार करण्यात आला. याउपक्रमामध्ये अकलूज येथील अकलाई विद्यालय तसेच जैन महावीर मंदिर विद्यालय येथील सुमारे 200 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने भारत देशाचा हुबेहूब नकाशा तयार करून मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता सर्वांनी १००% मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले . तसेच याद्वारे भारतातील सर्व नागरिक यांनी लोकशाही वर निष्ठा ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही धर्म,वंश, समाज, भाषा यांचे प्रभावाखाली न येता तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद दयानंद गोरे, जि. प. शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख प्रभाकर विठ्ठल ननवरे व मुख्याध्यापक उमा जाधव, मुख्याध्यापक पठाण पी. ए., राजश्री खरात, दत्तात्रय गायकवाड ,अनुपमा वसेकर, प्रदीप सातपुते, हमीद मुलाणी, उमेश फलटणकर, संतोष यादव, स्वीप सहाय्यक नोडल पवन भानवसे, स्वीप सहाय्यक नोडल सुनील काशीद, साहाय्यक निरिक्षक धोंडीराम भगनुरे व इतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button