श्रीपाद सेवा मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणाचे नियोजन
श्रीपाद सेवा मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणाचे नियोजन
संचार वृत्त अपडेट
श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ७५० चे निमित्ताने श्री श्रीपाद सेवा मंडळ संग्रामनगर ,अकलूज यांचे वतीने 25दिवसांचे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायीक घरगुती पारायण हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. श्रीपाद सेवा मंडळाचे प्रमुख दिलीप लोणकर यांनी माहिती सांगितली यामध्ये आपल्या सर्वांना रोजच्या रोज ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चे पारायण आपले स्वतःचे घरी करावयाचे आहे. रोजचे वाचनासाठी ३०मिनिटे वेळ पुरेसा आहे.प्रत्येकाला रोज सुमारे ३०० ओव्यां वाट्याला येतील.दिनांक १३ सप्टेंबर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती या शुभ दिनी आपण याची सुरुवात करणार आहोत ज्या भाविकांना यामध्ये भाग घ्यायचा असेल त्या भाविकांनी 98 34 17 26 29(अनिकेत शिरकांडे) या नंबरवर आपले नाव फोन करून किंवा मेसेज पाठवून नोंदवावे. काही अडचण असेल किंवा काही शंका असतील तर या फोन वर कधीही चौकशी करता येईल. आपला स्वतःचा ग्रंथ असेल तर फारच उत्तम. नसेल तर आपले श्रीपाद सेवा मंडळातून वरील क्रमांकावर फोन करून आपणास ग्रंथ मिळेल.
पारायण वाचन खालील प्रमाणे करावयाचे आहे.
शनिवार 13/9/2025 अध्याय 1व दुसऱ्या अध्यतील ओवी क्रमांक 80 पर्यंत.रविवार 14/9 अध्याय 3 ओवी 52 पर्यंत.सोमवार 15/9 अध्याय 4 ओवी 126 पर्यंत.मंगळवार 16/9 अध्याय 6 ओवी 70 पर्यत.बुधवार 17/9 आध्याय 6 ओवी 420 पर्यंत .गुरुवार 18/9 अध्याय 8 ओवी 58 पर्यंत .
शुक्रवार 19/9 अध्याय 9 ओवी 139 .पर्यंत .शनिवार 20/9 अध्याय 9ओवी 516 पर्यंत .रविवार 21/9अध्याय 10ओवी 335 पर्यंत .सोमवार 22/9.अध्याय 11ओवी 331 पर्यंत .
मंगळवार 23/9 अध्याय 11ओवी 681पर्यंत .बुधवार 24/9अध्याय 13 ओवी 71 पर्यंत .गुरुवार 25/9 आध्याय 13 ओवी 512. पर्यंत .शुक्रवार 26 /9अध्याय 13ओवे 864 पर्यंत .
शनिवार 27/9अध्याय 13ओवी1120 पर्यंत .रविवार 28/9 अध्याय 14 ओवी 300 पर्यंत .सोमवार 29/9 अध्याय 15 ओवी 266 पर्यत.मंगलवार 30/9 अध्याय15 ओवी 599पर्यंत .
बुधवार 1/10 अध्याय 16 ओवी 336 पर्यंत .गुरुवार 2/10अध्याय 17 ओवी 215 .पर्यंतशुक्रवार 3/10 अध्याय 18 ओवी 134 .पर्यंत शनिवार 4/10 अध्याय 18 ओवी 460 पर्यंत
रविवार 5/10 अध्याय 18 ओवी 812 पर्यंत.सोमवार 6/10 अध्याय 18 ओवी 1129 पर्यंत.मंगळवार 7/10 अध्याय 18 ओवी 1513 पर्यंत.बुधवार 8/10 अध्याय 18 ओवी 1811 .
शेवटचा 18 वा अध्याय संपल्यानंतर पहिल्या अध्यायातील 5 ओव्या वाचाव्यात.शेवटी आरती ,प्रसाद करून कुटुंबातील सर्वानी ग्रंथाचे ,माऊलींचे दर्शन घ्यावे.एक संकल्प मनी ठेवून वाचनास बसावे. माऊली पूर्ण करतीलच.
दिवसभरात कधीही आपले वेळेनुसार वाचनास बसावे.पारायणं पूर्ण झाल्यानंतर आपली नावे आळंदीतील ञाने.सेवा समितीकडे सुपूर्द करण्यासाठी वरील मोबाईलवर पाठवावीत किंवा समक्ष आणून द्यावीत.



