solapur

गणेश गाव येथील कवयित्री नुरजहा शेख यांना काव्य सम्राज्ञी पुरस्कार

गणेशगांव येथील कवयित्री नूरजहाँ शेख यांना काव्य सम्राज्ञी पुरस्कार जाहीर.

अकलूज  (प्रतिनिधी)
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव येथील कवयित्री नूरजहाँ फकरूद्दीन शेख यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचाच्या वतीने काव्य सम्राज्ञी पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.त्यामुळे माळशिरस तालुक्यात साहित्य क्षेत्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी शाखा पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात नूरजहाँ शेख यांनी कविता पाठवली होती.त्यांचा कवितेतील उत्कृष्ट लिखाणाबद्दल काव्य सम्राज्ञी पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.त्यामुळे नूरजहाँ शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्या ग्रामीण भागातील महिला कवयित्री आहेत त्यांनी कविता लिखाणाचा छंद जोपासला आहे.त्यांचे हिंदी व मराठी भाषेतून कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.त्यांच्या उत्कृष्ठ लेखणी ला काव्य सम्राज्ञी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मनोज जाधव (संस्थापक अध्यक्ष) भावना खोब्रागडे (सहसंस्थापिका संपादिका) जयद्रथ आखाडे (कार्याध्यक्ष पुणे) अल्पेश सोनवणे (ग्राफिक्सकार पुणे जिल्हा) यांनी त्यांच्या लेखणीस पुरस्कार दिला आहे.कवयित्री नूरजहाँ शेख यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण माळीनगरच्या दि मॉडेल विविधांगी प्रशालेत झाले आहे.पदवी पर्यंतचे शिक्षण अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात झाले आहे तर उच्च पदवीत्तर शिक्षण पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button