पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त;सोमनाथ भोसले
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील फादर युवक व महिला आघाडी या सर्व कार्यकारण्या बरखास्त करीत असल्याचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी नियुक्तीस एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने व नवीन कार्यकर्त्यांना पक्षामध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारण्या बरखास्त करीत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच माळशिरस तालुका नूतन कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार असून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जयदिपभाई कवाडे यांच्या माध्यमातून वेगवेगळी कर्ज प्रकरणे मिळवून देऊन कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कळविले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका नूतन कार्यकारणीच्या निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असून कार्यकारिणींमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भीमसैनिकांनी 9423327667 व 9923430435 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी केले आहे.