सहकार महर्षी कारखान्यास सहवीज प्रकल्पास उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार जाहीर
सहकार महर्षि कारखान्यास सहवीज प्रकल्पास “उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प” पुरस्कार जाहीर.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर दि.४(केदार लोहकरे)
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया यांचे वतीने सन २०२४ चा “उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प” पुरस्कार जाहीर झाला आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.यापूर्वीही सहकार महर्षि कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सहकार महर्षि कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांचा मोठा विश्वास असून चालू गळीत हंगामात १० लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.ऊस गाळपा बरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.या कामगिरीची दखल घेऊन को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी “उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प” पुरस्कार जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया यांचे वतीने सन २०२४ चा “उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प” पुरस्कार जाहीर झाल्याने कारखान्याचे संचालक, कार्यक्षेत्रातील सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कामगार तसेच हितचिंतक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.