वेळापूर येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा सोहळा उत्साहात संपन्न
वेळापूर खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा सोहळा उत्साहात साजरा !
वेळापूर अपडेट
वेळापूर एसटी स्टँड. जवळचे भाविकांचे आराध्य दैवत खंडोबादैवतीची चंपाषष्ठी उत्सव यात्रा धार्मिक सोहळा भक्ती भावाने पार पडला.
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडेरायाच्या मंदिरावर माळा टाकून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. खंडोबा मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन डिसेंबर रोजी खंडेरायाच्या घटाची स्थापना करण्यात आली होती. शुक्रवारी मंदिरामध्ये नाग दिव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी उत्सवा निमित्त सकाळी खंडेरायाला पारंपरिक मानाचा पोशाख उघडे परिवाराच्या वतीने घालून ऋषिकेश संतोष उघडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचे घट उठवण्यात आले. त्यानंतर भाविकांच्या घराघरातील घट उठले. दुपारी बारा वाजता आराध्य दैवत खंडेरायाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला. त्यानंतर पिसेवाडी येथील गजी ढोल संघाचा देवाच्या समोर गजी ढोल कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी दोन वाजल्यानंतर उपस्थित भाविकांना उघडे परिवाराकडून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी खंडेरायाच्या पालखीचे वेळापूर नगरीतून सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याच्या उधळण करीत देवाचा जयघोष करीत भाविकांनी, नागरिकांनी, मानकरी यांनी मिरवणूक काढली. खंडेरायाचा चंपाषष्ठी सोहळा पार पाडण्यासाठी देवाचे पुजारी विठ्ठल वाघ, तसेच उघडे परिवार ,कुलकर्णी परिवार, मुंगूसकर परिवार , वेळापूर उघडेवाडी व पिसेवाडीतील ग्रामस्थ यांनी उपस्थिती दर्शवली व परिश्रम घेतले व चंपाषष्ठी उत्सव उत्सवात साजरा केला. .