solapur

श्रीराम BCA/BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची विद्यापीठ संघात निवड

श्रीराम BCA/BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची विद्यापीठ संघात निवड

संचार वृत्त अपडेट 

श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव या महादिद्यालयातील कु.ननवरे नम्रता आप्पासो (बी.एस.सी.(ई सी.एस.) भाग-३) आणि कु.पांडुळे शितल महावीर (बी.एस.सी.(ई सी.एस.) भाग-२) या विद्यार्थिनीची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्थरीय गोविंद गुरु ट्रिबल युनिव्हर्सिटी, बनस्वरा, राजस्थान येथे दि.16 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यासाठी क्रीडा शिक्षक सुखदेव घुले व संतोष वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील , उपाध्यक्ष करण पाटील ,सचिव ॲड.अभिषेक पाटील, सहसचिव डॉ.समीर पवार व विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसो वनवे, महाविद्यालयाचे विभागप्रमुख राजेंद्र डावकरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button