पुरंदावडे येथील प्रभाकर थिटे यांचे अल्पशा आजाराने निधन
पुरंदावडे येथील मा. पोस्ट मन प्रभाकर थिटे यांचे अल्पशा आजाराने निधन
सदाशिवनगर (प्रतिनिधी ) पुरंदावडे येथील रहिवासी प्रभाकर वसंत थिटे यांचे आज सकाळी दि. १३डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्यांचे वय ८४ वर्षे असून ते माळशिरस येथे पोस्टात पोस्टमन म्हणून काम करत होते. त्यांचे पश्चात पत्नी सौ. मंगल ताई, दोन विवाहित मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. मंगल ताई आणि प्रभाकर काकांनी ब्रह्मचैतन्य सार्वजनिक वाचनालय व भजनी मंडळाची स्थापना केली. सुमारे ३२ वर्षापासून हे कार्य चालू आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेसाठी व विधीसाठी गावातील भजनी मंडळ, उपसरपंच देवीदास ढोपे, मा. उपसरपंच पांडुरंग सालगुडे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश ओवाळ, विजय पालवे, आनंदा सालगुडे, जेष्ठ भजनी मंडळाचे सदस्य श्री. गणपतराव सुतार, मुकुंद कोळी, निवृत्त जेलर संजय कुलकर्णी , भाविक, पत्रकार प्रा अर्जुन ओवाळ, नागरीक उपस्थित होते.