solapur

शिवसेना युवा सेनेच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जलसमाधी आंदोलन

शिवसेना युवा सेनेच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जलसमाधी आंदोलन

संचार वृत्त अपडेट 

युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत आणी गणेशगांव येथील गावकऱ्यांच्या वतीने गणेशगांव येथील बंधाऱ्यावर जल समाधी आंदोलन करण्यात आले .
माळशिरस तालुक्यातील निरा नदीवरील गणेशगांव येथील बंधारा गेली 5 ते सहा वर्ष झाले वाहून गेला असून त्याची तात्पुरती डाग डुजी ही करण्यात आली होती . ही तात्पुरती केलेली डागडुजी ही गेली 5 महिने झाले पुराच्या पाण्यात वाहून गेली .त्याच वेळी युवा सेनेच्या वतीने याच बंधाऱ्या वरती 30 जुलै 2024 रोजी जनांक्रोश आंदोलन केले होते . त्यावेळी तो बंधारा तात्काळ दुरुस्त करून देतो असे आश्वासन पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु तो बंधारा आजतागायत दुरुस्त केला नाही .गणेशगांव हा बंधारा माळशिरस आणी इंदापूर तालुक्याला जोडलेला असून या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यापारी वर्गाचे दळण वळण जास्त प्रमाणात आहे .याही पेक्ष्या तेथील शाळकरी मुलांना गेली 5 वर्ष झाले नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे लक्षात घेता.तेथील बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणी साठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने वतीने गणेशगांव येथे निरा नदी मध्ये जल समाधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी दत्ता साळुंखे शेखर खिलारे श्रीमंत शेंडगे विठ्ठल नलवडे नसरुद्दीन शेख विजय यादव मंगेश यादव शरद मोरे माऊली मदने हमीद कोरबु नागेश यादव भाईसाब शेख बापू गोखले काकासाहेब जगताप शंकर शेंडगे रावसाहेब शेंडगे विजय दळवी पांडुरंग मदने लक्ष्मण रुपनवर रामभाऊ ठोबरे युवराज पवार विक्रम साळुंखे कविराज पराडे, अवि पराडे, प्रशांत पराडे,ओम पराडे, रोहित इंगळे माऊली पराडे, विकास भाई, सिद्धू गायकवाड ,मनोज भोई, शंभू पराडे ,आदित्य भोई, आप्पा महाडिक, व गणेशगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

जर या बांधाऱ्याच काम तात्काळ न झाल्यास पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना खुर्ची वरती बसू देणार नाही असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button