चित्रपट दिग्दर्शक मकरंद माने व शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना 2024 चा “अकलूज भूषण” पुरस्कार जाहीर

चित्रपट दिग्दर्शक मकरंद माने व शिवशाही राजेंद्र कांबळे यांना २०२४ चा ” अकलूज भूषण ” पुरस्कार जाहीर.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मकरंद माने यांना व राज्य पुरस्कार विजेते शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना २०२४ चा अकलूज भुषण पुरस्कार जाहीर.
सहकार महर्षी कै. शंकररावजी नारायणरावजी मोहिते-पाटील यांचे विचारांचा वारसा जपणारे,लोकनेते स्व.प्रतापसिंहजी शंकररावजी मोहिते-पाटील (पप्पासाहेब) यांचे प्रेरणेने,महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांचे वतीने दरवर्षी अकलूज फेस्टिवल आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने,अकलुज शहरातील कला,क्रिडा, सांस्कृतिक,सहकार,उद्योग, पत्रकारिता,विज्ञान, लोकप्रशासन,समाजसेवा, अध्यात्मीक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांना दरवर्षी अकलुज भुषण हा पुरस्कार दिला जातो.
सन २०२४ चा अकलूज भुषण पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध दिग्दर्शक मकरंद माने यांना व राज्य पुरस्कार विजेते शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
याच बरोबर २०२३ मध्ये अकलूजचे सुपुत्र व सध्या लंडन येथे स्थायीक असलेले वैज्ञानिक अमोल मोहन भंडारे यांना जाहीर केलेला अकलूज भूषण पुरस्कार ३१ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांचे शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.असे अकलूज फेस्टिव्हलचे आयोजक डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.