जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती येथे भेट कार्ड निर्मिती कार्यशाळा संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती येथे भेटकार्ड निर्मिती कार्यशाळा संपन्न.
अकलूज (प्रतिनिधी)
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती (६० फाटा) शाळेत २०२४ सालाला निरोप देवून २०२५ या वर्षाला रंगोत्सव साजरा करू नववर्षाचा उपक्रम अंतर्गत भेटकार्ड निर्मिती कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी,इंग्रजी भाषेत सण समारंभावेळी देण्यात येणारे शुभेच्छा संदेश मुलांनी हसत खेळत शिकताना अंकांच्या आकडे मोडीसोबत भूमिती आकारांची सुंदर नक्षी कोरताना कागदांशी खेळत कार्यकृतींशी कलेची जोड जमली, आप्तस्वकियांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत स्वनिर्मित रंगांची उधळण करत संदेश वहनाची अनोखी भेटकार्डे तयार करण्यात आली.शालेय सर्व विषयांची सांगड घालून विद्यार्थ्यांना भेटकार्ड तयार करण्यास मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शिका,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, पत्रकार व पालक अशा अनेक भूमिका उत्कृष्ट पद्धतीने निभावणाऱ्या,सदैव शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सौ. शोभा तानाजी वाघमोडे यांचे श्री.निकम सर व सौ.गायकवाड मॅडम यांनी आभार मानले.
यावेळी जि.प. प्रा.शाळा पाटीलवस्ती (मा.) येथील सर्व ग्रामस्थ,महिला भगिनी,माता पालक,अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य,माता पालक संघ,निपुण भारत माता पालक समिती,सखी सावित्री समिती,शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य अंगणवाडी सेविका, मदतनीस,पाटीलवस्ती शाळेतील शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.