
मधमाशी पालन संवर्धन काळाची गरज !मधमाशा वाचवा ! शेती वाचवा! – सेवारत्न श्री सतिश शांताबाई कुंडलिक कचरे मंडळ कृषि अधिकारी अकलुज ISO9001
संचार वृत्त अपडेट
:2015 पृथ्वीवरील मधमाशा नष्ट झाल्या तर पुढील दोन वर्षात सर्व वनस्पती पिके नष्ट होतील – प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन .पृथ्वीवरील सर्व वनस्पतीच्या व पिकाच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका मधमाशा बजावत आहेत तसेच पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास महत्त्वाचा वाटा या मधमाशांचा आहे .म्हणून यांचे संवर्धन पालन करणे काळाची गरज आहे .हरितक्रांतीनंतर कृषी क्षेत्रात वाढलेल्या कीटकनाशकांचा वापर यामुळे मधमाशीच्या जाती प्रजाती कॉलनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत व यांचे स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे . यामुळे मधमाश्या वांझ होणे मर होणे व त्यांचे नैसर्गिक सहवास ठिकाण मध्ये बदल होत आहेत .मध काढण्याच्या लालचे पोटी अशिक्षित अंकुशल पारंपारिक जमाती आदिवासी मध गोळा करणारी लोकं यांच्या अशास्त्रीय मधु गोळा करण्यामुळे त्यांच्या वसाहती पिढ्या -नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत . उन्हाळी हंगामातील अन्नाचे दुरभिक्ष पाणी कमतरता यामुळेही यांचे स्थलांतर होत आहे .या सर्वांचे परिणाम म्हणून पिकाचे परागीकरण न होण्यामुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे .खालील फायद्यांचा मानवी जीवनातील वनस्पतीतील पिकातील उपयोग बघता यांचे पालन संवर्धन जोपासना करणे काळाची गरज आहे . मधमाशांचे कृषी, वनस्पतीशास्त्र वैद्यकीय शास्त्र, आहारशास्त्र व व्यापारी दृष्टिकोन महत्व खालील प्रमाणे आहे १ – इतर कुठल्याही उद्योगाशी स्पर्धा न करता आपणास यांच्याकडून शुद्ध मध शुद्ध मेन व विषाचे उत्पादन होते . त्याचे आहारदृष्ट्या ,वैद्यकीय दृष्ट्या खूप महत्त्व आहे . २ -मध आणि मेणाचा उपयोग औषधे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी मध्ये केला जातो . ३ -परागीभवनाद्वारे पिकांच्या आणि फुलांच्या उत्पादनात भरीव वाढ सह निसर्गाचे संतुलन व संवर्धन केले जाते . ४ -मधमाशांच्या विषचा उपयोग सौंदर्यप्रसाधने व औषधीय उत्पादने बनवण्यास होतो . ५ -मधमाशा मुळे कापूस, मोहरी ,तीळ, कराळे, सूर्यफूल, वांगी ,भेंडी ,मिरची, काकडी, भोपळा, सफरचंद, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, लिची, कलिंगड, खरबूज ,मूग ,उडीद, तूर, मटकी व जंगलातील वनस्पती इत्यादीचे परागीभवन होण्यास मदत होते .यामुळे या पिकामध्ये संशोधनातून पंधरा टक्के उत्पादनाची वाढ दिसून येत आहे . ६ -ऊर्जा देणारा अन्नघटक व स्नायू बळकटीकरणासाठी मधमाशांचा मधाचा उपयोग होतो . ७ -मध एक उत्तम नैसर्गिक अँटिबायोटिक व अँटीसेप्टिक आहे . ८ -खोकला, दमा ,यकृत व पोटाच्या आजारावर विकारावर खूप गुणकारी आहे . ९ -वजन कमी करण्यासाठी जलद गतीने थकवा घालवून कार्यशक्ती वाढवण्यासाठी मधाचा वापर केला जातो . १० -घशातील खवखव शांत करण्यासाठी व जखमा भरण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो . ११ -स्त्रियांमध्ये टेस्टोस्टिरॉन पातळी सामान्य राखणे प्रजनन कार्य सुधारणे व मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी व हार्मोनल संतुलन राखण्यासाठी मधाचा उपयोग होतो . १२ -पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता व गतिशीलता वाढवण्यासाठी मधाचा उपयोग होतो . १३-म धा पासून रियल जेली चे उत्पादन होते याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने व औषधांमध्ये केला जातो .इत्यादी बाबींचा उपयोग पाहता मधमाशांचे नैसर्गिक रित्या किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून कृत्रिम रित्या जोपासना करणे अनिवार्य होऊन बसले आहे .नैसर्गिक रित्या मध गोळा करत असताना खालील प्रमाणे काळजी केली घेतली तर नक्कीच आपण संवर्धन करू शकू यात काय शंका नाही . मध गोळा करणे -नैसर्गिक रित्या आढळणाऱ्या मधमाशी पोळी मध व मेना पूर्ण नष्ट केली जातात . यामुळे त्यामध्ये उत्पादित होणारी पुढची पिढी नष्ट होऊन पुढील पिढीचे पुनरुत्पादन कमी होऊन संख्या कमी होण्यास मदत होते .यासाठी मध गोळा करणाऱ्या ग्रामस्तरावरील व्यक्ती प्रशिक्षित करणे काळाची गरज आहे . यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती व मधुमक्षिका पालन केंद्र व प्रशिक्षण केंद्र महाबळेश्वर येथे प्रशिक्षण दिले जाते .मधमाशांच्या पोळ्यामध्ये फक्त वरील दहा ते पंधरा टक्के भागात मधाचे साठवण केले जाते व राहिलेल्या ८५ ते ९० टक्के भागात मधमाशांची अंडी परागण कण व त्यांचे पुनरुत्पादन कॉलनी असतात .मधासाठी पोळी काढले जाते त्यावेळेस संपूर्ण पोळ्या काढून राहिलेला खालचा ८० टक्के भाग फेकून दिला जातो . त्यामुळे त्यांची भविष्यात निर्माण होणारी पिढी नष्ट होते .मधमाशांच्या कॉलनीमध्ये राणीमाशी, कामकरी माशी आणि नर माशी यांना ठराविक आयुष्य असते .मधमाशी पोळी मधासाठी काढण्यासाठी खालील कार्यपद्धतीचा वापर केला तर नक्कीच आपण पुढील पिढीचे संवर्धन करून शकतो यासाठी ‘झाडाच्या फांद्यावरील भिंतीवरील पोळे काढत असताना संपूर्ण पोळे अलगदपणे काढून घ्यावे काढणीनंतर पोळ्यातील वरच्या बाजूचा दहा ते पंधरा टक्के भाग हंगामानुसार की ज्यामध्ये म ध साठवलेला असतो तो वेगळा करावा तो वेगळा केल्यानंतर राहिलेले ८५ ते ९०% पोळे लाकडाच्या फ्रेम मध्ये किंवा पोळ्या भोवती दोन्ही बाजूला लांबीच्या दिशेने लहान काटे बांधून अशी पोळी दुसऱ्या ठिकाणी झाडाच्या फांदीला बांधून ठेवावे .बांधलेल्या पोळ्या भोवती कामकरी माशा त्या पोळ्यातील गंध व माशांचा गंध यामुळे पुन्हा बसण्यास सुरुवात होते त्यावर बसल्यानंतर तिथे त्यांना सुरक्षित वाटल्यानंतर राणी माशीला ते घेऊन जातात व पुढील त्यांची प्रक्रिया चालू राहते .याप्रमाणे जर आपण मधमाशांचे पुढील पिढी जतन करू शकलो तर नक्कीच मधमाशांचे संवर्धन होऊन कृषी क्षेत्रात उत्पादनात जो मोलाचा वाटा आहे . त्यासाठी आपण मदत करू यात काय शंका नाही . टिप -सुरक्षित साधने कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ, संरक्षण आयुधे व प्रथमोपचार साहित्य उपलब्धतेनुसार मधमाशांची पोळे मधासाठी काढणे चा प्रयत्न करावा यामध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम घेऊ नये .आपणास या माहितीद्वारे आव्हान करण्यात येते की कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र मधुमक्षिका पालन केंद्र यांच्याकडे विनामूल्य असणाऱ्या प्रशिक्षण घेऊन मधमाशांचे संगोपन पालन व संवर्धन करण्याचे अहवान मंडळ कृषी अधिकारी अकलूज ISO9001 :2015 कार्यालय मधील सर्व आधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे .