श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्धांचे हेळसांड थांबवण्याचे आदेश

श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्धांचे हेळसांड थांबवण्याचे आदेश
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील सामाजिक कल्याण येवं मानव संरक्षण संघाच्या वतीने विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग,अकलूज यांना अमोल माने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वयोवृद्धांचे हेळसांड थांबवण्याचे निवेदन देण्यात आले होते.
निवेदनात श्रावण बाळ योजनेतील तालुक्यातील लाभार्थी यांना निवासी नायब तहसीलदार यांना भेटणे बंधनकारक केल्याने सक्षम तपासणी मध्ये वयोवृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांची हेळसांड थांबविण्याची मागणी केली होती. याचीच दखल घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी माळशिरस तहसीलदार यांना वृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांची हेळसांड थांबवण्याचे आदेश दिले. याच अनुषंगाने तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र चालक, आपले सरकार सेवा केंद्र यांचे उपविभागीय अधिकारी माळशिरस यांच्या अध्यक्ष खाली बैठक घेऊन निवेदनातील मुद्देबाबत सकारात्मकता दाखवत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्यांच्या बाबतीत पडताळणी आवश्यक आहे अशांना कार्यालयात केवळ निवासी नायब तहसीलदार यांनाच भेटावे अशी सक्ती नसून उपलब्ध तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार यांनाही भेटता येईल.
सुरेश शेजुळ,तहसीलदार,माळशिरस