solapur

श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्धांची होणारी हेळसांड थांबवण्याचे आदेश

श्रावणबाळ योजनेच वयोवृद्धाची होणारी हेळसांड थांबवण्याचे आदेश.

संचार वृत्त अपडेट 

अकलूज: सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने व पदाधिकारी यांच्या वतीने  श्रावण बाळ योजनेच्या वयोवृद्धाची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी, उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले होते, श्रावणबाळ योजनेच्या वयोवृद्धाना निवासी नायब तहसिलदार यांना समक्ष भेटणे बंधनकारक केल्याने श्रावणबाळ योजनेचे वयोवृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांची हेळसांड होत होती ही हेळसांड थांबविण्याचे आदेश, उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज विजया पांगारकर  यांनी दिले आहेत.

लाभार्थ्यांच्या बाबतीत पडताळणी आवश्यक आहे अशांना कार्यालयात केवळ निवासी नायब तहसीलदार यांनाच भेटावे अशी सक्ती नसून उपलब्ध तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार यांनाही भेटता येईल.
सुरेश शेजुळ,तहसीलदार माळशिरस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button