संघटना फोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास कोणीही बळी पडू नये अनेक भामटे सोडून गेले ; राजू शेट्टी

संघटना फोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास कोणीही बळी पडू नये अनेक भामटे सोडून गेले ; राजू शेट्टी
संचार वृत्त अपडेट
साधारण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तोपर्यंत संघटनेच्या मागण्यांची, आंदोलनांची कदर होत होती. पुढे मात्र फोडाफोडी सुरू झाली हे आपण पहातोच आहोत. मला कुठेतरी सत्तेत सामावून घेऊन ही संघटना कुणाच्या तरी पायावर नेऊन ठेवण्याचे प्रयत्न झाले. मात्र मी त्यास तयार नसल्याने संघटना फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, त्यास कुणी बळी पडू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना केले. अकलूज येथील शासकीय विश्रागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रथम पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त करताना संघटनेत आलेली मरगळ, शिस्त, पुनर्बाधणी याबाबत मते मांडली. त्यानंतर शेट्टी म्हणाले, मला अगदीच काही माहिती नाही असा विषय नाही. मात्र संघटना प्रमुखाने आईच्या भूमिकेत राहावे लागते. संघटनेच्या माध्यमातून अनेकांची कामे होतात. आज संघटना सोडून जाणारे कुठे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. या वेळी विजय रणदिवे,अजित बोरकर, शिवाजी पाटील, सचिन पाटील उपस्थित होते.
अनेक भामटे सोडून गेले
आंदोलनात राजकीय व्यक्ती असतील तर त्या आंदोलनाला महत्त्व येते. त्यासाठी संघटनेने राजकीय क्षेत्रात भाग घेणे काही गैर नाही. त्यामुळे आता येत्या १६ तारखेनंतर संघटनेतील कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेऊन व पुनर्बाधणी करून नव्यांना संधी देण्यात येईल संघटनेचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असले तरी चळवळीची ताकद वाढते त्यातील अनेक भामटे सोडून गेले परंतु बिल्ला लावणाऱ्याला ताकद दिली तर तो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो.असे शेट्टी यांनी सांगितले.