solapur

आदर्श समाज घडवण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज ; मदनसिंह मोहिते पाटील

पालकांनी मुलांना उच्च शिक्षणाबरोबर आदर्श संस्कार देणे गरजेचे आहे;मदनसिंह मोहिते- पाटील.

रूद्रा डेंटल क्लिनिकचे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न.

संचार वृत्त अपडेट

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
सध्याच्या काळात आदर्श समाज घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज आहे.पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आदर्श संस्कारांचे ध्येय ठेवले तरच त्यांचे आणि समाजाचे भविष्य उज्वल होईल.त्यामुळे पालकांनी मुलांचे शिक्षण आणि आदर्श संस्कारांचे ध्येय ठेवावे असे मत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
अकलूज येथे डॉ.सावन पालवे यांच्या रूद्रा डेंटल क्लिनिकचे मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.एम. के.इनामदार,डॉ.निलेश फडे,डॉ. संतोष खडतरे,डॉ.किरण फडे, डॉ.संजय सिद,डॉ.ए.बी.आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पुढे बोलताना मोहिते-पाटील म्हणाले की,शिक्षणाचे महत्त्व सांगत शिक्षणामुळे जीवन आनंदी होते असे सांगितले तसेच आई-वडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी असते. आपला मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षित होऊन समाजात आदर्श नागरिक म्हणून ओळखला जावा ही त्यांची धडपड पाहून मुलांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविणे गरजेचे आहे.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.एम.के.इनामदार म्हणाले की, कठोर परिश्रमास पर्याय नाही आहे‌.समाजाच्या निरोगी आणि दिर्घायुष्य करण्यासाठी डॉक्टर प्रामाणिक प्रयत्न करीत असतात.निरोगी समाजासाठी डॉक्टरांचे महत्वाचे योगदान असते.भविष्यात नवीन डाॅक्टर निर्माण होणे गरजेचे आहे.त्यासाठी मुलांनी कष्ट व परिश्रम घेण्याची गरज आहे.
या कार्यक्रमासाठी सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे,श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीचे नगरसेवक प्रकाश नवगीरे,विक्रमसिंह लाटे,मौला पठाण,दादासाहेब लाटे,संजय गळीतकर,प्रा.मगर, पत्रकार बांधव,व्यापारी बंधू, आरोग्य सेवक-सेविका यांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागेश लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजीराव पालवे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा लावंड, अजिनाथ आंधळे,प्रविण सावंत, अविनाश गायकवाड,आकाश मोरे,केतन लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button