अकलूज येथे विविध मागण्यासाठी महावितरणच्या लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अकलूज येथे विविध मागण्यासाठी महावितरणच्या लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथे विविध मागण्यांसाठी महावितरणच्या लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
अकलूज — प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महावितरणमधील लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी क्रमबद्ध आंदोलनाचे टप्पे आजपासून अकलूज मध्ये सुरू करण्यात आले. संपूर्ण राज्यात अशा अंदोलनाची सुरवात झालेली असुन सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नाकडे व मुख्य कार्यालयातील परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेच्या कर्मचाऱ्यांकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले. तसेच अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता आण्णासाहेब काळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अकलूज विभागाचे अध्यक्ष राजकुमार भुईटे, हरीभाऊ माने, रमेश लवटे, नितीन घुरे, समीर सोनटक्के, योगेश देसाई, दत्ता कोळी, शांतीलाल शिंदे आदी युनियन चे मान्यवर उपस्थित होते.संरक्षणात्मक उपकरणे महावितरण परिपत्रकानुसार न दिल्याने लाईन वर अपघात होत असल्याने हे अपघात रोखण्यासाठी उपकरणे देण्यात यावी, थकबाकी एक सांधिक प्रयत्न आहे. केवळ लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांवर वसुली जवाबदारीचे निर्धारण स्वीकारले जाऊन होणाऱ्या शिस्त भंग कार्यवाही व परिपत्रकाची अमलबजावणी होत नाही, लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे दिर्घकालीन प्रलंबित प्रश्न ८ तासांची वेळ निश्चितीसाठी, स्वतंत्र वेतन श्रेणी, वाहन भत्ता, श्रेणी मूल्यांकन, धुलाई भत्ता, शिलाई भत्ता, विद्युत सहाय्यकांचा कार्यकाल गृहीत धरण्यासाठी, अॅनोमली कमिटीची बैठक संघटनेसमवेत होण्यासाठी, कर्मचाऱ्यांमधील निर्माण झालेल्या असंतोषासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐवढे मोठे आंदोलन असताना देखील विज ग्राहकांना कुठलाहि त्रास झालेला होवु दिलेला नाहि , शासनाला जाग येण्या साठी हे आंदोलन संपूर्ण राज्यात शांततेत चालू असल्याचे युनियन प्रमुख नितीन घुरे यांनी सांगीतले.