महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाला आदेश आंदोलनाची दखल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाला आदेश मंत्रालया समोरील ठिय्या आंदोलनाची घेतली दखल
संचार वृत्त अपडेट
प्रतिनिधी : : अकलूज मधील नीरा नदीमध्ये आणि पुरंदवडे हद्दीत दूषित पाणी सोडनाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली ४ फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी दूषित पाणी सोडणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांना माहीत असताना सुद्धा ते संबंधित दूषित पाणी सोडनाऱ्यावरती वरती कारवाई करत नाहीत म्हणून अकलूज येथील डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर ४ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.सकारात्मक उत्तर न दिल्याने व योग्य चौकशी न केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचे २३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंतचे (कॉल डिटेल्स रेकॉर्ड )तपासण्याची करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
ं
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश ज्योती रामदास कदम यांची पक्षप्रमुख किरण साठे आणि आंदोलनकर्ते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी भेट घेतली.आणि निवेदन सादर करून निरा नदीमध्ये सोडण्यात येणारे दूषित पाणी कुठून येत आहे ? आणि पुरंदावडे हद्दीत दूषित कुठून पाणी येत आहे ? याची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पुणे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे मंत्रालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेतली आहे.मात्र अकलूजमधील निरा नदीमध्ये व मौजे पुरंदावडे गावात पाणी सोडणाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन थांबविणार नसल्याचे आंदोलनकर्ते प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सांगितले.