ओंकार कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिलासा

ओंकार कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिलासा
शेतकरी हिताला प्राधान्य देत समाधानकारक दर दिला ; बाबूराव बोत्रे पाटील
संचार वृत्त अपडेट
ओंकार साखर कारखाना चांदापुरी (ता. माळशिरस)येथील कारखान्याने चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगामात परिसरात संपूर्ण उसाचे गाळप केले. गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ओंकार साखर कारखान्याकडे धाव घेतली.
फेब्रुवारी महिना मध्यावर आल्यानंतर आपल्या अतिरिक्त उसाचे गाळप झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली व आर्थिक अडचण झाली.त्यामुळे उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. ऊन वाढल्याने उसाच्या वजनात घट होणार आहे. त्याचबरोबर ओंकार साखर कारखान्याने उसाला समाधानकारक दर ३००० रूपये तर फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या उसास ३१०० रूपये देणार असल्याची घोषणा झाली आहे.
यापूर्वीची ऊसबिले वेळेत काढल्याने पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओंकार साखरकारखान्याला ऊस घालणे पसंद केले. दररोज एक हजार ते बाराशे टन ऊस गाळपास येत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात ओंकार कारखान्याने साथ दिली. त्यामुळे भविष्यात आमचे सहकार्य राहील, अशा भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या. तर ओंकार साखर कारखाना परिवार ऊस व दराबाबत कोणाशीही स्पर्धा करीत नाही. मात्र शेतकरीहिताला प्राधान्य देत असल्याचे बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले.