ताहिरा फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न

ताहिरा फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न
संचार वृत्त अपडेट
तालुक्यातील अग्रगण्य सामाजीक संघटना ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने अकलूज परिसरातील एम.पी.एस.सी परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. साजिया रशीद तांबोळी असिस्टंट महसूल सहाय्यक व साजिदा अब्दुल रशीद मुल्ला. अन्न सुरक्षा अधिकारी यांचा सन्मान ताहेरा फाउंडेशनच्या वतीने संपन्न झाला.
विविध सामाजीक उपक्रमापैकी आदर्श पालक सन्मान सोहळ्यात रशीद तांबोळी यांचा आदर्श पालक म्हणून आनंदयात्री जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ताहेरा फाउंडेशनच्या वतीने सत्कार झाल्याची आठवण राशिदभाई यांनी आवर्जुन सांगितली .
ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी दोन्ही गुणवंतांचे कौतुक करताना, मुस्लिम समाजातील इतर विद्यार्थ्यांनी शिकण्याचे आवाहन केले. रत्नाईपार्क चे हाजी युसूफभाई तांबोळी यांनी रशीदभाई यांनी प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिल्याबदल अभिनंदन केले. साजिया तांबोळी यांचा सन्मान शफिया तांबोळी यांच्या हस्ते झाला, तर साजिदा मुल्ला यांचा सन्मान रेश्मा तांबोळी यांच्या हस्ते झाला.
या सत्कार समारंभासाठी ताहेरा फाउंडेशनचे खजिनदार हाजी असलमभाई तांबोळी हाजी रशिद मुल्ला, रशिदभाई तांबोळी, सरफराज तांबोळी, इन्नूस तांबोळीसर, शकील मुलाणी व इलाही बागवान उपस्थित होते.