स्पेसवेल इंटेरियर डिझाईन एल. एल. पी.कंपनी पुणे कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

स्पेसवेल इंटेरियर डिझाईन एल. एल. पी.कंपनी पुणे कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील शेंडेवाडी गावातील शेंडे कुटुंब (रणजित, मिलिंद व ऐश्वर्या शेंडे )यांच्या पुणे बाणेर येथील स्पेसवेल इंटेरियर डिझाईन एल. एल. पी.कंपनी या नामांकित इंटेरियर डिझाईन कंपनीला वर्ष -2025 चा आर्किटेक्चर & इंटिरियर डिझाईन अवार्ड हा पुरस्कार दि.21 ऑगस्ट 2025 रोजी बंगलोर येथील हॉटेल ताज वेस्ट एंड या ठिकाणी देऊन गौरव करण्यात आला.
बांधकाम व डिझाईन बाबतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून इंटिरियर डिझाईन विभागात विशेष कामगिरी केली त्यासाठी संपूर्ण भारत देशातून कामाची गुणवत्ता आधारे अनुभवी तज्ञ यांच्या पॅनल प्रमुखांनी या कंपनीची निवड केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व स्पर्धात्मक युगात या कंपनी ने पुणे सारख्या मोठ्या शहरात व संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दिदीप्याम कामगिरी केली.शेंडेवाडी सारख्या छोठ्या गावातून पुण्यात जाऊन कंपनी स्थापन करून त्याचा विस्तार करणे व कमी दरात सेवा उपलब्ध करून देत असल्यामुळे या कंपनीचा ग्राहक वर्ग देखील वाढत आहे.या कामगिरी बाबत सध्या सर्वच स्तरातून कंपनी स्टाफ व डायरेक्टर वर्ग यांचे कौतुक होत आहे. या सर्व कंपनी जडणघडणी मध्ये रणजित, मिलींद, ऐश्वर्या शेंडे यांचे परिश्रम व शेंडे कुटुंबाची साथ लाभली आहे.