गरजूंना दवाखाना, शिक्षण,शालेय साहित्य यासाठी महात्मा फुले पतसंस्थेची नेहमीच मदत ; रंजन गिरमे

गरजूंना दवाखाना, शिक्षण,शालेय साहित्य यासाठी महात्मा फुले पतसंस्थेची नेहमीच मदत ; रंजन गिरमे
म.फुले पतसंस्था १५ टक्के लाभांश देणार
संचार वृत्त अपडेट
येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाणार असून सभासदांच्या मुलामुलींकरता परदेशी शिक्षणाला जाण्यासाठी संस्थेकडून एक लाख रुपयांची मदत देणार असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांनी जाहीर केले.
पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालयात झाली. ते पुढे सांगितले की, पतसंस्था नेहमीच गरजूंच्या मदतीकरता दवाखाना, शिक्षण, शालेय साहित्य यासाठी मदतीचा हात पुढे करत असते. त्यासाठी दरवर्षी १० ते १२ लाखाची मदत केली जाते.
यावेळी सचिव योगेश कचरे यांनी अहवाल वाचन करून २०२४-२५ या सालामध्ये संस्थेस ८२ लाख २१ हजार ४७८ रुपयांचा नफा झाला. वार्षिक उलाढाल २१७ कोटी रुपयेची असून ऑडिट वर्ग ‘अ’ कायम राहिला आहे. ५२० सभासद असलेल्या या संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ११ लाख २० हजार तर राखीव व इतर निधी १४ कोटी ९२ लाख ८ हजार १६२ रुपये आहे. तसेच २२ कोटी ८९ लाख ५८ हजार ४३० रुपयांच्या ठेवी आहेत.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महादेव एकतपुरे, संचालक किरण गिरमे, अंकुश फुले, चंद्रकांत जगताप, अमोल गिरमे, जयवंत चौरे, सूरज वाघमोडे, कृष्णा भजनावळे, प्रभा काळे, किशोरी चवरे, तज्ज्ञ संचालक जनक ताम्हाणे, अमित टिळेकर उपस्थित होते.



