solapur

अकलूज नगर परिषदेत येणार महिला राज

अकलूज नगर परिषदेत येणार महिला राज

संचार वृत्त अपडेट 

 अकलूज नगरपरिषदेच्या निर्मितीनंतर पहिल्याच निवडणुकीत अकलूज नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. नगराध्यक्षपदाची पहिली निवडणूक होत असल्याने अकलूज ग्रामपंचायत कारभारातील अनुभवी माजी महिला सरपंच, सदस्या इच्छुक आहेत.

१९२२ साली स्थापन झालेल्या अकलूज ग्रामपंचायतीचे ९९ वर्षानंतर ३ ऑगस्ट २०२१ साली नगरपरिषदेत रूपांतर झाले. सन २०२२ साली निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली; परंतु राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून स्थगिती झाल्यानंतर तीन वर्षांनी न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यातील नगरपंचायत, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आरक्षण आज अकलूज मुंबईत काढण्यात आहे. यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. नगरपरिषद स्थापनेनंतर प्रथमच नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने अनुसूचित जाती महिला नगराध्यक्षपदासाठी नवख्या महिलांपेक्षा ग्रामपंचायत कारभारातील अनुभवी महिला माजी सरपंच व सदस्या प्राधान्याने इच्छुक राहतील. यात माजी सरपंच पायल मोरे, माजी सदस्या प्रतिभा गायकवाड, अर्चना गायकवाड, रेश्मा गायकवाड, नाजुका मोरे यांच्यासह सुवर्णा साठे, कल्पना गायकवाड या महिला भगिनी इच्छुक आहेत. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button