विजयदादांच्या हस्ते ताहेरा फाउंडेशनची लॅपटॉपची मदत

विजयदादांच्या हस्ते ताहेरा फाउंडेशनची लॅपटॉपची मदत
संचार वृत्त अपडेट
मीअब्दाल शेख लुमेवाडी-इंदापूर तालुक्यात राहतो.गेल्या वर्षी यशवंतनगर-अकलूजच्या इंजिनिअरिंग काॅलेजचा डिप्लोमा टाॅपर आहे.मला पुढे शिकून खूप मोठ होऊन स्वतःच्या पायावर उभ रहायचंय.परंतु सध्या माझी परिस्थिती थोडी बिकट आहे.मला तुमच्या ताहेरा फाउंडेशन च्या मदतीची गरज आहे.ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी अब्दालची चौकशी केली.सर्व कागदपत्रे तपासून ताहेरा फाउंडेशनच्या आपल्या सर्व जबाबदार सहकाऱ्यांना अब्दालची कहानी कथन केली.सर्व सोपस्कार पुर्ण झाले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शिवरत्न बंगला येथे अब्दाल शेखला ताहेरा फाउंडेशनच्या वतीने लॅपटॉप देवून अब्दाल च्या शिक्षणाची अडचण दूर करण्यात आली.यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्याचे अभिनंदन केले.अब्दाल ला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिला.
कार्यक्रमास मुस्लीम समाजातील जेष्ठ कमालभाई शेख,मुक्तार कोरबू,हाजी मौलाभाई मुलाणी,शब्बीर शेख,भैया माढेकर,दादा तांबोळी,जावेद तांबोळी,रफिक तांबोळी उपस्थित राहून ताहेरा फाउंडेशनच्या शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थ्यांला केलेल्या मदतीसाठी सर्वांनी कौतुक केले.
ताहेरा फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच्या उपक्रमाचा अहवालाची क्षणचित्रे-फोटो पाहून विजयसिंह मोहिते पाटील यांनी ताहेरा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना शाबासकीची थाप दिली व पुढेही लोकउपयोगी उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शन केले.
ताहेरा फाउंडेशनचे खजिनदार हाजी.अस्लमभाई तांबोळी,जाकिरभाई तांबोळी,मुसाभाई तांबोळी हे मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते.