नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओंकार ग्रुपच्या माध्यमातून कोटीची मदत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओंकार ग्रुपच्या माध्यमातून कोटीची मदत
संचार वृत्त अपडेड
राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे तसेच शेतीसंबंधित साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत ओंकार ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील व संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटींचे योगदान देऊन शेतकऱ्यांच्या संकट काळात मोलाची मदत
केली आहे. ही मदत रक्कम मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, मंत्री दादा भुसे आणि श्रीमती यामिनी पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीची रक्कम प्रदान केली. ओंकार ग्रुपने यापूर्वीही शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून, हा दानशूरतेचा उपक्रम त्याच सामाजिक संवेदनशीलतेचा एक भाग आहे.
शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. समाजाप्रती जबाबदारी म्हणून ही मदत रक्कम देणे हे आमचे कर्तव्य समजतो. ओंकार ग्रुप सदैव शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध आहे. – बाबुराव बोत्रे-पाटील, चेअरमन