solapur

जांबूड च्या मल्लांनी गाजवले कुस्तीचे मैदान! पै.अजय-सुजय यांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते गौरव

जांबूड च्या मल्लांनी गाजवले कुस्तीचे मैदान! पै.अजय-सुजय यांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते गौरव

संचार वृत्त अपडेट 

जांबूड ता.माळशिरस: येथील मातीतील लाल पैलवान अजय भूसनर पाटील व सुजय भूसनर पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवत मैदान गाजवले. या दोन्ही मल्लांनी घवघवीत यश संपादन करून जांबूड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या यशाबद्दल राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते दोन्ही पैलवानांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी दोन्ही मल्लांच्या गळ्यात विजयाची मेडल्स झळकत होती. यावेळी परिसर “जय बजरंग बली” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

मंत्री भरत गोगावले म्हणाले, जांबूड सारख्या ग्रामीण भागातून अजय-सुजय सारखे मल्ल तयार होणे ही अभिमानाची बाब आहे. कुस्ती हा महाराष्ट्राचा मातीतला खेळ आहे. ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी व कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. या खेळाडूंना लागेल ती सर्व मदत केली जाईल.” त्यांनी दोन्ही पैलवानांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्काराने भारावून गेलेल्या पै. अजय व सुजय यांनी “आई-वडील, वस्ताद व गावकऱ्यांच्या आशीर्वादाने हे यश मिळाले. मंत्री महोदयांनी केलेला सन्मान आमच्यासाठी ऊर्जा देणारा आहे. यापुढे राष्ट्रीय पातळीवर गावाचे नाव उज्ज्वल करू,” अशी भावना व्यक्त केली.

यावेळी ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भीमराव भूसनर पाटील, सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, शासकीय समिती सदस्य तानाजी भोसले,पैलवान भोळे पाटील सादिक पठाण, विद्यार्थी शिवसेनेचे शिवदत्त भोळे पाटील, ओबीसी प्रमुख शहाजी काळे, विक्रम काशीद ,शुभम राऊत अमीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button