solapur

तांबवे येथे भक्तिमय सोहळा ! भजनी मंडळाच्या गजरात गोकुळाष्टमी उत्साहात,गोपाळकाल्याने सप्ताहाची सांगता

तांबवे येथे भक्तिमय सोहळा !

भजनी मंडळाच्या गजरात गोकुळाष्टमी उत्साहात, गोपाळकाल्याने सप्ताहाची सांगता

संचार वृत्त अपडेट

तांबवे (ता.माळशिरस ) येथे गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

मध्यरात्री ठीक बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा जयजयकार करत जन्माष्टमीचा गुलाल टाकण्यात आला. यावेळी भक्तिमय वातावरणात संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या गोपाळकाला व जन्माष्टमी सप्ताहाची सांगता यावेळी करण्यात आली. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त कुलकर्णी परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button