solapur

माळीनगर मध्ये सत्कार सोहळा,स्वाभिमानी पँनलच्या विजयाची चर्चा  नितीनराजे मित्र मंडळाने केला विजय उमेदवारांचा सन्मान

माळीनगर मध्ये सत्कार सोहळा,स्वाभिमानी पँनलच्या विजयाची चर्चा 

नितीनराजे मित्र मंडळाने केला विजय उमेदवारांचा सन्मान

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

दि सासवड माळी  एज्युकेशन सोसायटी माळीनगरच्या निवडणुकीत स्वाभिमान पॅनलने एकतर्फी विजय मिळवत संस्थेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.या विजयाबद्दल नितीनराजे मित्रमंडळाच्या वतीने विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीकडे परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले होते.या निवडणुकीत स्वाभिमान पॅनलने मिळवलेल्या एकतर्फी विजयामुळे  उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर नितीनराजे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात रत्नदीप बोरावके, अविनाश जाधव,कल्पेश पांढरे, केतन बोरावके, प्रीतम राऊत, विक्रांत कुदळे, स्नेहा गिरमे, रोहित गिरमे, मंजुषा झगडे,आदी विजयी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे  निंबाळकर, सहकारमहर्षी कारखान्याचे संचालक विराजसिंह निंबाळकर,मनोज शिंदे, गजेंद्र शिंदे,अविनाश जाधव, रणजीत निंबाळकर, युवा नेतृत्व यशराज निंबाळकर,दादासाहेब लवटे,विकास माने आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. संस्थेची परंपरा जपत शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि संस्थेचा नावलौकिक वृद्धिंगत करणे, ही आगामी काळातील महत्त्वाची उद्दिष्टे ठरावीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.संस्थेच्या आगामी वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button