अकलूज-निमगाव रस्ता खड्डे बुजवण्याचे काम सुरू

अकलूज-निमगाव रस्ता खड्डे बुजवण्याचे काम सुरू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व संचार वृत्त च्या बातमीची बांधकाम विभागाने घेतली दखल
संचार वृत्त अपडेट
अकलूज निमगाव रस्ता खड्डेमय नागरिक त्रस्त या मथळ्याखाली संचार वृत्त ने दि 13 10 25 रोजी बातमी प्रसिद्ध केली होती याच बातमीची दखल घेऊन बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.डी.कडतारे यांनी तातडीने हालचाल करून जलद गतीने खड्डे बुजवण्याचे काम चालू केले असून विजयवाडी येथील ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व संचार वृत्त चे आभार व्यक्त केले लवकरच डांबरीकरणाचे काम हायवे पर्यंत करण्यात येणार असल्याचे कडतारे यांनी सांगितले.

बांधकाम विभागाला ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, शेतकी अधिकारी राजाराम बोरकर व इतर कार्यकर्त्यांचे विजय वाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.



