political

माळशिरस विधानसभेला यावेळी कोन बाजी मारणार.

बी.टी.शिवशरण
श्रीपूर(प्रतिनिधी)
येत्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे माळशिरस विधानसभा निवडणुकीत अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे गत पंचवार्षिकला भाजपचे राम सातपुते हे माळशिरस विधानसभेला काठावर पास झाले आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम जानकर यांनी चांगलेच दमवले होते माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे

पहिले दोन पंचवार्षिकला राष्ट्रवादी काँग्रेसचे कै हनुमंत डोळस हे आमदार म्हणून निवडून गेले होते त्यांच्या अकाली मृत्यू नंतर पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आरपीआय व शिवसेना युतीकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली सातपुते हे स्थानिक उमेदवार नव्हते तरी मोहिते पाटील यांचे मुळे ते निवडून आले काही अपक्ष व इतर घटक पक्षांचे एक दोन उमेदवार हेही निवडणुकीत उभे राहिले होते पण मुख्य लढत सातपुते व जानकर यांच्यात झाली त्यावेळी संपूर्ण मोहिते पाटील परिवार भाजपकडे होता आता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सोडले तर संपूर्ण मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे आहेत लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील परिवारातील धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघात लाखांचे मताधिक्याने निवडून आले आहेत

विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे पारंपरिक राजकीय कट्टर विरोधक असलेले उत्तम जानकर व मोहिते पाटील यांच्यात राजकीय सामाजिक सख्य जुळले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणून आणण्यात उत्तम जानकर यांचाही मोठा सहभाग राहिला आहे जानकर व मोहिते पाटील यांच्यात राजकीय समझोता असा ठरला आहे की माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणायचे व माळशिरस विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना सहकार्य करायचे या बोलीवर जानकर गट व मोहिते पाटील गट यांच्यामध्ये छुपा करार झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे मोहिते पाटील यांचे मनातील माळशिरसचे आमदार उत्तम जानकर जरी असले तरी यावेळी दलित संघटना जागरूक व आक्रमक झाल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत स्थानिक बौध्द किंवा मातंग समाजातील उमेदवारच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार या साठी माळशिरस तालुक्यात दलित समाजात जनजागृती वैचारिक मंथन व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क सुरू असल्याची माहिती आहे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची जरी भाजप एकनाथ शिंदे गट यांचे बरोबर युती असली तरी तालुक्यात यावेळी परिवर्तन घडवून आणायचेच यासाठी कार्यकर्ते हट्टाला पेटल्या ची वस्तुस्थिती आहे गेल्या पंचवार्षिक ला माळशिरस विधानसभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा सोडली होती परंतु उद्या आरपीआयचे उमेदवार फार्म भरायला जाणार अशी व्यवस्था व तयारी असतानाही आदल्या रात्री भाजपने अचानक बाहेरचा उमेदवार राम सातपुते यांना उमेदवारी दिली व माळशिरस विधानसभेला हाता तोंडाशी घास आला असताना भाजपने आरपीआयचे ताट हिसकावून घेतले ते शल्य दलित समाजात आजही आहे लोकसभा निवडणुकीत आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आरपीआयला शिर्डी व सोलापूर या दोन जागा मागितल्या पण भाजप व घटक पक्षांनी एकही जागा दिली नाही

केवळ निवडणुकीत रामदास आठवले यांना स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केली व त्या बदल्यात केंद्रात राज्यमंत्री केले मात्र या मंत्रीपदावर आरपीआय कार्यकर्ते समाधानी नाहीत त्यांच्या मनात दोन जागा न सोडल्याची खंत अद्यापही आहे असे एकंदरीत कार्यकर्त्यांच्या उघड नाराजी वरुन दिसते या वेळी माढा लोकसभा खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आहे तसेच महविकास आघाडी ची ताकद माढा लोकसभा मतदारसंघात वाढली आहे भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे दलित मतदार मुस्लिम मतदार यावेळी कोणाच्या पारड्यात मतदान टाकते तसेच मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला आहे

मराठा आरक्षणावर सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे त्यामुळे यावेळी माळशिरस विधानसभा निवडणुक कोणालाच सहज व सोपी राहिली नाही हे नक्की उत्तम जानकर यांच्या जातीचे प्रमाणपत्र या बाबत दलित समाजात खदखद आहे त्यामुळे काटे की टक्कर आता पासूनच लोकांत चर्चा सुरू आहे कोणत्या समाजाचे किती मतदान ही आकडेवारी बोलायला व चर्चा करायला ठिक आहे पण निवडणुकीत जागृत व हुशार मतदार बरोबर गणित सोडवतो हे ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे यावेळी माळशिरस विधानसभेत कोण प्रतिनिधित्व करणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button