उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे शालेय मुलांना खुर्च्या व शालेय गणवेश वाटप
उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे शालेय मुलांना खुर्च्या आणि शालेय गणवेश वाटप..
अकलूज (प्रतिनिधी)
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथील श्री शंभू महादेव अंगणवाडी या शाळेतील मुलांना शालेय गणवेश आणि खुर्च्या वाटप युवासेना उपतालुका प्रमुख रुपेश लाळगे यांच्या वतीने करण्यात आले या साहित्याचे वाटप युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व शिवसेना तालुकाप्रमुख अमोल उराडे आणी युवासेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख सनी गवळी उपशहरप्रमुख रिहाल तांबोळी नवनाथ राऊत ऋत्विक पदमन धनंजय बोराटे अक्षय मदने आदित्य लाळगे किरण खिलारे महेश आडाने गणेश मोरे ज्ञानेश्वर डफळ विजय कुंभार सुशांत खंडागळे रोहन पदमन अंगणवाडी सेविका सिंधू काळे मदतनीस कोमल पिसे इत्यादी उपस्थित होते.