माणसातील देव माणूस हरपला सुभाष(आप्पा) सावंत
माणसातील देव माणूस हरपला*
सुभाष (आप्पा )सांवत
ऍड अविनाश टी काले
मो . 9960178213
मी नुकताच गावावरून प्रवास करून अकलूज ला घरी पोहचलो , आणि आमचे सातारा विभागातील संपादक मित्र दिपकजी माने साहेब यांचा फोन आला .
आपणास वाकाव येथे जायचे आहे ,उद्या सकाळी 7वाजताना.तानाजी राव सावंत साहेब , आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे थोरले बंधू सुभाष (आप्पा ) यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आहे.पहाटे तीन वाजता ते मला घेऊन जाणार असल्याने , रात्री 1नंतर मी झोपलो च नाही , आणि सर्व कार्यक्रम उरकून घेऊन मी तयार झालो.सर्व साधारण रित्या आपला एक समज असतो की राजकारणात नावाजलेली माणसे अचानक मोठी झालेली असतात व त्यांनी कधीच गरिबी भोगलेली नसते .पण , ना तानाजीराव सांवत सर यांनी आमच्या मित्राला अनेकदा त्यांचे किस्से आणि सुख दुःखाचे प्रसंग सांगितले होते ,आणि हे आपल्या लेखणीच्या साहाय्याने आमच्या मित्राने इतके गहिरे बनवले होते की ते वाचल्या नंतर आपण सावंत परिवाराच्या प्रेमात पडतोच पडतो.तसेच माझे झाले , आपल्या जिल्ह्यातील या हिऱ्याची ओळख आपणास नसावी आणि कुणी तरी ती करून द्यावी , आणि आपणच आपल्या स्वतः वर खजील व्हावे असे माझ्या बाबतीत घडले .माझा त्यांचे शी कधीच सबंध आलेला नव्हता , पण माझे हृदय त्यांच्या शी जोडले गेलेले होते .गुगल चे सहकार्य घेऊन ही आम्हाला पुन्हा पुन्हा खात्री करून मार्ग काढावा लागला होता .आणि आम्ही बाय कार ने अगदी पहाटे पाच साडे पाच चे सुमारास वाकाव येथील त्यांच्या शेतातील बंगल्यावर पोहचलो ,आत प्रवेश करताना उजव्या हाताला लहान मुलासाठी असलेल्या घसरगुंडी पासून सर्व प्रकारची खेळण्याची साधने दिसली .मी अनेक राज्यकर्त्या ना भेटी दिल्या पण असे चित्र मला कधी दिसले नव्हते .यातून एक कतुहल जागे झाले ,वेळ भरपूर असल्याने चालत गेट जवळ पोहचलो , त्याच गावातील लोंढे नावाचे सुरक्षा रक्षक गेट वर बसलेले होते , वयाच्या 25तील हा तरुण पण त्याचा ही स्वभाव लाघवी , त्याने आम्हाला बसायला खुर्च्या दिल्या , आणि आमची चर्चा सुरू झाली .
अर्थात विषय आप्पाचा होता ,आप्पा साधारण 74वर्षाचे होते , आणि ते आरोग्या ने सदृढ होते , अगदी चालणे आणि व्यायाम हा त्यांचा नियमित असे .पुढे प्रा शिवाजीराव काळूंगे सर , सीताराम बाबा साखर कारखान्याचे सर्वे सर्वा व धनश्री पतसंस्था परिवाराचे धनी यांनी त्यांच्या शोक सभे दरम्यान सांगितले की आप्पा हे मंगळवेढा येथे तलाठी म्हणून कामाला होते .
घरात एकूण भावंडे पाच , आप्पा पेक्षा ही मोठे बंधू कालीदास , त्या नंतर आप्पा , त्या नंतर उत्तम राव , नंतर आपले आरोग्य मंत्री , व त्या नंतर प्रा शिवाजी राव सांवत , त्यांची सर्वांची 11मुले असा भला मोठा परिवार ,,सिना नदी जवळ होती , पण ती 20वर्षापूर्वी कोरडी ,सावंत परिवारा कडे उनिपूरी 4ते 4• 5एकर जमीन .गाव माढा पासून ही लांब अंतरावर , आज ही आसपास हॉटेल नाहीत , चहा प्यायचा म्हणले तरी किमान 7/8किमी वर जाऊन तो प्यावा लागेल , अश्या खेडे गावात , कोणताही राजकीय वारसा नसलेले हे अल्प भूधारक शेतकरी कुटुंब ,,एक तलाठी किती पुरावा? त्यांच्या त्या काळी पगार तरी किती असायचा? दर शनिवार रविवार आप्पा सायकल द्वारे मंगळवेढा वरून गावी पोहचायचे ,,,माझ्या भावा ना मी शिकवून प्राध्यापक बनवणार च हा आप्पा चां ध्यास ,,कॉलेज ची फी न परवडणारी , त्यात डोनेशन द्यायला ही पैसे नाहीत ,आपल्याला पुढे शिक्षण घेता येणार नाही म्हणून खिन्न झालेले तानाजी राव पाहून आप्पांच्या पोटातील आतड्याला पिळ पडला .एका बाजूला स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीचे अक्राळ विक्राळ कराल रूप ,,परिस्थिती कधीच कोणावर दया दाखवत नाही , ती तिचे काम करत राहते ,परिस्थिती चे रडगाणे गाऊन दयेचे पात्र फिरवत राहिल्याने त्यात सहानुभूती , आणि त्या सह कुचेष्टा या शिवाय कांहीं पडत नाही . हा जगाचा नियम आहे ,
परिस्थिती वर मात करायची असेल तर त्यावर आरूढ होण्याची हिंमत ही दाखवावी च लागते , तोच पुरुषार्थ असतो .आजची सुखासीन आयते मिळालेली पिढी कर्तबगार का निपजत नाही? याचे कारण जीवनाचा संघर्ष त्यांना ज्ञात नसतो .आप्पा नी तानाजी राव यांना जवळ घेतले ,, बापाची जागा आप्पांच्या रूपाने भावाने भरून काढली ,,रामायणातील राम लक्षण यांच्या तील बंधू भाव आणि समर्पण येथे अवतरित झाले ,,तू खचू नको ,, “ताना” हा आप्पा तुम्हाला नाउमेद झालेलं पाहू शकणार नाही , उद्याच्या उद्या ही सगळी जमीन विकून टाकु पण तुम्हाला शिक्षण सोडून चालणार नाही , वाटेल तितकी फी लागू दे ,, शेवटी कऱ्हाड येथील इंजिनियरिंग कॉलेज मध्ये एडमिशन मिळाले , हॉस्टेल मध्ये साहेब राहिले ,पण शिक्षण सोडले नाही संस्कृत मध्ये वचन आहे त्याचा मराठी भावार्थ हाच सांगतो की”ज्याला विद्या पाहिजे त्याला सुख नाही “आणि ज्याला सुख पाहिजे त्याला विद्या नाही”माणसाला ध्यास असावा लागतो , परिस्थितीची जाणीव असावी लागते , आणि या परिस्थिती वर मी मात करेनच हा दुर्दम्य आशावाद ही असावा लागतो , त्या साठी कठोर मेहनत घेण्याची स्वतः ची तयारी असावी लागते ,हे सर्व गुण व त्याचे बाळ कडू पिलेल हे सावंत घराणे आहे ,आज त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थात व कारखान्यात 30हजार कर्मचारी आहेत , ही बाब लहान सहान नाही .सावंत घराणे राजकारणात आहे , उद्योग व्यवसायात आहे , म्हणून त्यांची स्तुती करावी इतका मी स्तुती पाठक नाही .पण जे भावले , पाहिले ते लिहिल्या शिवाय राहणे ही माझ्या स्वभावात नाही .त्या खेळण्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता , ती खेळणी गावातील सर्व जाती धर्माच्या लहान मुला साठी ठेवलेली होती , आणि त्यांनी इथे यावे , खेळावे , बागडा वे असे आप्पा ना वाटायचे त्या मुलासाठी शालेय तासा व्यत रिक्त वेळेत उपलब्ध करून देताना त्या समवेत बिस्किटे , वडा पाव याची ही सोय आणि स्वच्छ सीलबंद पाण्याच्या बाटली ची व्यवस्था हे सगळं अभिनव होत .आप्पा फिरत फिरत आले आणि गेट वरील सुरक्षा रक्षकांच्या डब्या कडे त्यांचे लक्ष गेले की ते हमखास विचारत आज डबा आणला नाही काय?
आणि थोड्याच वेळात थेट बंगल्यातून डबा गेट वर येणारच ,,,याच बंगल्याच्या बाहेर मला मोराची केकावली ऐकायला मिळाली ,स्वर्ग अजून काय असतो ? तो आप्पा आणि त्यांच्या भांवडाणी निर्माण केला .नात्यातील जिव्हाळा अद्याप पर्यंत टिकवून ठेवला जो आज दुर्मिळ झालेला आहे .नियती आणि निसर्ग रचनेपुढे कोणाचीच सत्ता चालत नाही ,तसेच आप्पांच्या बाबतीत झाले , आजारपण नाही , अंथुरनावर खिळून पडणे नाही , अचानक हृदयाचा तीव्र अटॅक येतो आणि सोलापूर येथे उपचार घेत असतानाच हा त्यांनी स्वतः चे परिश्रमाने निर्माण केलेला इहलोकातील स्वर्ग सोडून परलोकातील स्वर्गाकडे ते न सांगता निघून गेले .समग्र सांवत कुटुंबीय , पंचक्रोशीतील नातेवाईक , गाव करी यांचे हेलावले ले अंतकरणाचे सुर ग्वाही देत होते की आप्पा माणसातील देव माणूस होते .मी या लेखा द्वारे सावंत परिवारास एकच विनंती करेनआप्पांच्या स्मृती जपण्या साठी एक आनंदवन निर्माण करा , एखाद्या एकरात सर्व प्रकारची फळ झाडे लावा .ती सर्व फळे घरातील , लहान थोर , आणि गावातील मुले ही खातील , त्या आनंदवनात ते खेळतील बागडतील , पक्षांना ती झाडे चारा देतील ,जीवनातील सर्वात मोठे सुख आपल्या आवडत्या माणसासाठी अस कांहीं करण असते , ते करावे ,, आप्पा जिथे ही असतील ते यातून सुखावतील ,,, आनंद दायी होतील ,,,एक कल्पना सुचली म्हणून हा लेखन प्रपंच ,,,, आप्पा चे स्मृतीस विनम्र अभिवादन रक्षा विसर्जन कार्यक्रमास सर्व पक्षीय नेते उद्योजक उपस्थित होते ,शिवाजी राव काळूंगे सर , सीताराम बाबा खर्डी साखर कारखाना व धनश्री परिवार चेअरमन संजय बाबा कोकाटे , राष्ट्रवादी काँग्रेस श प नेते माढा उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते (अजित दादा)साईनाथ अभांग राव , शिवसेना नेतेसंभाजी शिंदे , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य व शिवसेना नेते ,ऍड अविनाश काले , सामाजिक नेते यांनी मनोगत व्यक्त करून सुभाष आप्पा यांच्या आठवणी ला उजाळा देऊन त्यांना भावपूर्णश्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी उत्तमराव माने शेंडगे पाटील मराठा सेवा संघ नेते , आदी सह उस्मानाबाद बार्शी तालुक्यातील शिवसेना प्रमुख यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.