युवा सेनेच्या मागणीला यश विद्यार्थ्यासाठी माळीनगर ते टेंभुर्णी एसटी बस सेवा चालू
युवा सेनेच्या मागणीला यश प्रवाशी राजा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी माळीनगर ते टेंभुर्णी एसटी बससेवा चालू
माळीनगर (प्रतिनिधी)
अकलूज आगाराचे आगार प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या कडे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी शालेय विध्यार्थांसाठी मळीनगर ते टेम्बुर्णी बस सेवा चालू करण्याची मागणी केली होती अकलूज आगारातून सायंकाळी 5 च्या पुढे येणाऱ्या सर्व बसेस फुल होऊन येत असल्या मुळे माळीनगर येथील शालेय मुलांना घरी पोहचण्यासाठी रात्रीचे आठ वाजत होते .त्यामुळे मुलांचे अभ्यासाला वेळ भेटत नव्हता .ही बाब आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी लक्षात आणून दिली असता .तात्काळ अकलूज चे आगार प्रमुख यांनी ही बाब वरिष्ठांशी चर्च्या करून प्रवाशी राजा दिनाचे औचित्य साधून माळीनगर ते टेम्बुर्णी ही बस सेवा चालू केली
.या बस सेवेचे उदघाट्न अकलूज आगाराचे आगार प्रमुख प्रमोद शिंदे व माळीनगर चे प्रिन्सिपल कलप्पा बिराजदार यांनी केले या बस सेवे मुळे दोन नंबर गट तांबवे पाटी पायरी पूल पंचवीस चार गणेशगांव लवंग सेक्शन वाफेगाव पाटी जांभूळबेट संगम शेवरे माळेगाव खुळेवस्ती टेम्बुर्णी येथील विध्यार्थाना फायदा झाला .ही बस सेवा चालू केल्यामुळे विध्यार्थी व पालक वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .या बस उदघाट्नावेळी शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर शिवसेनेचे नेते लक्ष्मण तात्या डोईफोडे संगम चे युवा नेते सागर इंगळे माळीनगर चे शिक्षक रितेश पांढरे कल्याण कापरे राजू देवकर सुनिल जवरे दामू राठोड सुनिल शिंदे जगन्नाथ कोळी रामदास जाधव सचिन आतकर शरद नलवडे दगडू वाघमारे धनाजी चव्हाण राजेश कांबळे संदीप गलादे इ .शिक्षक उपस्थित होते