गावकुसाबाहेर राहिलेल्या अठरा पगड समाजातील लोकांनी कष्ट करुन इथल्या व्यवस्थेशी जुळवून घेतले होते
गावकुसाबाहेर राहिलेल्या अठरा पगड समाजातील लोकांनी कष्ट करून इथल्या व्यवस्थेशी जुळवून घेतले होते
श्रीपूर( बी टी शिवशरण)
ज्यांच्या आयुष्याच्या अनेक पिढ्यांना गावकुसाबाहेर ठेवलं होतं त्यांचा इथल्या जमीनीवर हक्क होता पाणी हवा जगण्याचा अधिकार मुक्त स्वातंत्र्य असताना त्यांचे अधिकार हक्क स्वातंत्र्य हिराऊन घेऊन त्यांना वाईट वागणूक दिली जात होती तरी त्या गावकुसाबाहेर पशूहीन जिवन जगलेल्या माणसांनी दुसर्याच्या जमिनीची वाटणी मागितली नाही अपार कष्ट अंगतोड मेहनत करून आपला उदरनिर्वाह केला पण दुसर्याच्या ताटातील भाकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नाही स्वाभिमान सोडला नाही गावगाडा प्रचलित समाजव्यवस्था यांनी ठरवून दिलेली कामे प्रामाणिकपणे करुन गावाशी एकरुप नाते घट्ट जुळवून घेतले कसलाही कांगावा नाही उथळपणा नाही गावगाडा बारा बलुतेदार यांचे कामकाजावर अवलंबून होता तत्कालीन समाजव्यवस्थेत जाती प्रमाणे कामांची विभागणी केली होती सारे काही बिनबोभाट यंत्रवत असायचे तत्कालीन पाटील देशमुख वतनदार गोरगरीब जनता मागासवर्गीय लोकांना मदतीला धावून जात असायचे ते दिवस तो काळ आठवायचे कारण त्यावेळी जातीत धर्मात भांडण लावली जात नव्हती धर्म चार भिंतींच्या आत सोज्वळ भुमिकेतून पावित्र्यात जपला जात होता जातपात शिवाशिव सोवळे ओवळे होते पण नाहक त्याचे अवडंबर माजवले जात नव्हते कारण प्रचलित समाजव्यवस्था मनुवादी विचारसरणी असल्यामुळे उपेक्षित वंचित घटकांना गावाचे विरोधात धर्ममार्तंड यांचे विरोधात जाण्याची क्षमता ताकद नव्हती कारण व्यवस्थेने त्यांना कर्मकांड रुढी परंपरा जातीपातीच्या जोखडात करकचून बांधून टाकले होते कुत्र्या मांजराला किंमत होती पण माणुस असुनही दलितांना किंमत नव्हती मात्र हजारो वर्षे जातपात धर्म रुढींचे जाचहटातून बाहेर काढण्यासाठी तेहतीस कोटी देवांचा धावा होत होता पण एकाही देवाला आमची दया आली नाही त्यांनी जातीचे जोखडातून बाहेर काढले नाही पण एक दिवस असा आला चौदा एप्रिल एकोणीसशे एकयाणणव रोजी एक नररत्न जन्माला आले आणि जे तेहतीस कोटी देवांना जमलं नाही ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने आंधळ्याना दृष्टी अपंगांना पाय बहिरयांना कान व आमच्या देहात माणूस म्हणून जगण्याची उर्जा स्वाभिमान हक्क स्वातंत्र्य देऊन आम्हाला माणूस म्हणून घडवले तेव्हा कुठं आम्हाला जगता आले बाबांनो अस्पृश्य होणं सोप नसत एकदा जगून बघा सवलती आरक्षण असले लाचारी चे तुकडे कोण मागतो आमच्या शेकडो पिढ्यांनी जो वनवास भोगला त्यावेळी स्वतंत्र भारतात संविधान आमच्याच महामानवाला लिहण्याची वेळ यावी काय हा निसर्गनिर्मित चमत्कार म्हणायचा सामाजिक समतेच्या प्रवाहात एकतेचा व राष्ट्रीय बंधुत्वाची समाजव्यवस्था पुन्हा सर्व बांधव सर्व समाज एक आहे आणि यासाठी मागासवर्गीय समाजाला सामाजिक राजकीय शैक्षणिक आरक्षण देण्यात आले हा समाज शिक्षणाने पुढं जात आहे यांच्या पुर्वजांकडे जमिनी नव्हत्या वाडे नव्हते अंगातील मेहनत कष्ट प्रामाणिक चाकरी व गावाबरोर इमान होते पण यासाठी दुसर्याच्या मालमत्तेवर डोळा ठेवला नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे.