solapur

एक राखी सैनिकांसाठी जि.प. प्राथमिक शाळा राव बहादूर गट बिजवडी येथे राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न

एक राखी सैनिकांसाठी’ या संकल्पनेतून जि. प. प्राथमिक शाळा,रावबहाद्दूर गट बिजवडी येथे राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली

माळीनगर (प्रतिनिधी) सैनिक म्हटले की आपल्या शरीरात एक अद्भुत शक्तीचा संचार झाल्याची अनुभूती येते. सैनिकांच्या योगदानातून संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो. देशप्रेमाचे जिवंत रूप म्हणजे देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत ही खडा पहारा देत देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाची बाजी लावणारा सैनिक. सण असो वा आनंदाचा दिवस ‘समर्पण सेवा’ हाच मोठा सण मानणारे सैनिक बांधव. या सैनिक बांधवांमुळेच आपण ताठ मानेने देशातील महाशक्ती बनवण्याचे स्वप्न पाहत आहोत.

असे सैनिक बांधवांच्या योगदानाची जाणीव ठेवून आपणही त्यांच्या प्रति स्नेहभाव जपावा या भावनेतून रावबहाद्दूर गट शाळेत ‘तिरंगा राखी’ तसेच विविध रंगाच्या तब्बल ५०० राख्या बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.

शाळेतील उपक्रम शिक्षक अजमीर फकीर सर ,मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर, अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरीजा गेजगे यांनी मुलांना राखी बनवण्यास मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button