स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश वाटप
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रावबहाद्दूर गट बिजवडी शाळेत साहिल स्पोर्ट्स यांचेमार्फत विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश वाटप
देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे*
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे..!!
संचार वृत्त
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट बिजवडी येथे मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज, खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील मित्र परिवार अकलूज, साहिल स्पोर्ट्स अकलूज यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना रुपये १५००० किमतीचे स्पोर्ट्स गणवेश वाटप करण्यात आले.साहिल स्पोर्ट्स मार्फत दरवर्षी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकरी भक्तांना अन्नदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. रावबहाद्दूर गट शाळेतील मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स गणवेशाची मागणी केल्याबरोबर त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले. त्याबद्दल साहिल स्पोर्ट्स, मनशक्ती केंद्र, तसेच खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील मित्र परिवार यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
बिजवडी गावचे सरपंच पूजाताई शिंदे, उपसरपंच वर्षाताई मदने, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशा भजनावळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत राऊत सर, अजमीर फकीर सर, सारिका चव्हाण,गिरिजा चव्हाण उपस्थित होते.