महर्षी संकुलात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा
महर्षि संकुलात भारताच्या इतिहासाची जाणीव करून देणारा 78 वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न
संचार वृत्त
आजची युवक पिढी हे उद्याचे भारत देशाचे आधारस्तंभ असून त्यांनी आपल्या ठाई असणाऱ्या कलागुणांना विकसित करावे.
नारायण शिरगावकर.
उपविभागीय पोलीस अधिकारी,
अकलूज.
महर्षि संकुल यशवंतनगर येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला .कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज, प्रशाला समिती सभापती नितीनराव खराडे हे उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून संकुलातील स्काऊट व गाईडची पथके तसेच वाहतूक सुरक्षा व नागरी सेवा दल या पथकांमार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. महर्षि संकुलाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तीचे प्रतीक असणारी सामूहिक कवायत सुंदर पद्धतीने सादर केली. काव्या सावंत, रूद्रा घाडगे ,वैभवी गोडसे ,वृषाली कारमकर या विद्यार्थिनींनी आपल्या तडफदार भाषाशैलीतून स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर याच्या मार्गदर्शनानुसार शरीर माध्यम खलुधर्म साधनम या उक्तीला अनुसरून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मानवी मनोरे सादरीकरण केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात महर्षि पूर्व प्राथमिक विभागामार्फत देशभक्तीपर गीत, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला रंगीला तर महर्षि प्रशालेच्या कलाकारांनी ऐसा देश है मेरा असे देशभक्तीपर गीत सादर करत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.नारायण शिरगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आजची युवक पिढी हे उद्याचे भारताचे भविष्य आहे असे सांगत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली .या कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे ,अनिल जाधव ,विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,लक्ष्मण लावंड, अमृता लोखंडे ,मुख्याध्यापक शिवाजी पारसे, अनिता पवार, उप- मुख्याध्यापक भारत चंदनकर ,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे सर्व शिक्षक वृंद व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता सारे जहाँसे अच्छा या समूहगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, प्रतिभा राजगुरु, नाझिया मुल्ला यांनी केले .स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.